७० च्या दशकातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई म्हणजेच तनुजा यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील जुहूजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तनुजा यांना सोमवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तनुजा यांना वयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आणखी वाचा : ‘काहे दिया परदेस’नंतर सायली संजीव – ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र; अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली…

तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याने चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी अनेक चाहते सातत्याने प्रार्थना करत होते.

दरम्यान तनुजा या १९६० आणि ७० च्या दशकात अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटात झळकल्या. “बहारें फिर भी आएंगी”, “मेरे जीवन साथी”, “जीने की राह”, “दया निया”, “तीन भुवनेश्वर” यांसारख्या अनेक चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या. तनुजा या बॉलिवूमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि तनिषा मुखर्जी यांच्या आई आहेत. काजोलने तिच्या आईच्या पाऊलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत करिअर केले. तिने तिच्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

आणखी वाचा : स्मृती इराणींनी मासिक पाळीबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘झिम्मा २’चे कलाकार म्हणाले, “महिलांना चार दिवस…”

काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला. काजोलच्या ‘त्रिभंगा’, ‘सलाम वेंकी’ या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काजोलची बहिण तनिषा ही देखील मनोरंजन विश्वात काम करते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kajol mother and veteran actor tanuja discharged from hospital nrp
Show comments