सध्या सर्वसामान्य लोकांप्रमाणे बॉलिवूड कलाकारही सगळे सण अगदी थाटामाटात साजरे करत आहेत. गेली २ वर्षं कोणलाच काही सण साजरे करता न आल्याने आता यावर्षी सगळेच खूप आनंदात आहेत. बॉलिवूडमध्येही चांगलंच धमाल वातावरण पाहायला मिळतंय. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या घरी खासगी पार्ट्या आयोजित केल्या आहेत. अभिनेत्री क्रीती सनॉनने ही दिवाळीनिमित्त एक जंगी पार्टी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता बॉलिवूडचा सर्वोत्तम फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या खासगी दिवाळी पार्टीतले फोटोज सध्या खूप व्हायरल होत आहे. तमाम बॉलिवूडकरांनी या पार्टीत हजेरी लावली. विकी-कतरिना, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सारा अली खान, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, सुहाना खान, अनन्या पांडे अशा कित्येकांनी या पार्टीत हजेरी लावली.

आणखी वाचा : ‘कांतारा’ ऑस्करसाठी पाठवा; कंगना रणौतची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

अभिनेत्री ‘काजोल’ही या पार्टीत दिसली आणि सोशल मीडियावर नेटकरी तिच्या लूकच्या प्रेमात पडले आहेत. ९० च्या दशकात कित्येकांच्या मनावर राज्य करणारी काजोल आजही तितकीच सुंदर दिसत आहे. या पार्टीत तिने चकचकीत पर्पल आणि काळ्या रंगाची एक डिझायनर साडी परिधान केली होती. ही साडी खुद्द मनीषने डिझाईन केली असून तिची किंमत तब्बल ३,२५,०००० इतकी आहे.

मनीष मल्होत्राच्या ब्रँडची ती डिझायनर साडी, बॅकलेस ब्लाऊज, तसेच आकर्षक कानातले आणि ओठांवर असलेली हलकीशी न्यूड लिपस्टिक हा काजोलचा ग्लॅमरस लूक आणि त्यांची किंमत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्या साडीची किंमत ऐकून कित्येकांचे डोळेच पांढरे पडले आहेत. मनीषच्या या पार्टीतले फोटोज आणि व्हिडिओज चांगलेच व्हायरल होत आहेत.