अभिनेत्री कल्की कोचलिन दोन वर्षांपूर्वी आई झाली. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण लग्न न होताच आई झाल्यामुळे कल्कीला खूप ट्रोल केलं गेलं. यावर आता अभिनेत्रीनं मौन सोडलं आहे. अलीकडेच झालेल्या मुलाखतीमधून अभिनेत्रीनं ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं आहे.

‘मॅशबेल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कल्की कोचलिन म्हणाली की, “माझं पहिलं लग्न दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर झालं होतं. आता जो माझा जोडीदार गाया हर्षबर्ग आहे, त्याला लग्न करण्यात अजिबात रस नाहीये. मी आधीच घटस्फोटित आहे आणि त्यामुळेच मलाही लग्नात रस नाहीये. त्यामुळे मी आणि हर्षबर्गने खूप विचार केल्यानंतर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी आम्ही एकत्र राहतो.”

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

हेही वाचा – “माझा दादा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता अन्…” हेमांगी कवीने नितीन देसाईंच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली, “असा निर्णय घेताना…”

कल्की आपल्या जोडीदारबरोबर गोव्यात राहत आहे. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, “गोव्यात राहण्याचे कारण मुलगी आहे. कारण मला असं वाटतं की, माझ्या मुलीचं बालपण चारी बाजूला हिरवळ असलेल्या ठिकाणी जावं. मी पहिल्यांदा हर्षबर्गला इस्रायलमध्ये भेटले होते.”

हेही वाचा – “साम्राज्य उभं केलं असं वाटणारी माणसं आतून किती…”; दिग्दर्शक अक्षय इंडीकरची नितीन देसाईंच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया

हेही वाचा – नितीन देसाई यांनी लूक का बदलला होता? त्यांनीच सांगितलेलं दाढी वाढविण्यामागचं कारण

दरम्यान कल्कीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती ‘मेड इन हेवन सीझन २’मध्ये झळकणार आहे. शिवाय कल्की दीप्ति नवलच्या ‘गोल्डफिश’ चित्रपटामध्येही दिसणार आहे. २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये मायलेकीची कहाणी दाखवण्यात आली आहे.

Story img Loader