बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. अनेकदा बॉलिवूड आणि राजकारणातील घडामोंडीवर कंगना तिचं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. तिच्या वक्तव्यांमुळे कित्येकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावात दोन गोष्टींवर बोली लावली आहे. यामुळे ती पुन्ही एकदा चर्चेत आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना मिळालेल्या १२०० भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. या लिलावात अभिनेत्री कंगना रणौतने मोदींना भेट मिळालेल्या दोन वस्तूंवर बोली लावली. कंगनाने राम मंदिराची प्रतिकृती आणि राम मंदिरातील माती यावर बोली लावली. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत कंगनाने या लिलावात सहभागी होण्यासाठी आवाहनही केलं आहे.

हेही वाचा >> “नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे यांच्या लिलाव सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. या लिलावातील त्यांना मिळालेल्या राम मंदिराची प्रतिकृती आणि राम मंदिरातील माती यावर मी बोली लावली. तुम्ही कोणत्या गोष्टीवर बोली लावली असती? यातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग ‘नमामी गंगे’ प्रोजेक्टसाठी केला जाणार आहे. तुम्हीसुद्धा यात सहभागी व्हा. जय हिंद!”, असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही पाहा >> Inside Photos : आलिशान हॉल, गॉसिप करण्यासाठी खास कट्टा अन्…; चाळ संस्कृतीची थीम असलेलं ‘बिग बॉस मराठी’चं घर पाहिलंत का?

हेही वाचा >> “’बिग बॉस’च्या घरात जायला…”, महेश मांजरेकरांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

कंगना ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.