बॉलिवूड अभिनेत्री कधी अभिनयामुळे चर्चेत येतात तर कधी लूक मुळे किंवा वादग्रस्त विधानांमुळे, बॉलिवूडची धाकड गर्ल अर्थात कंगना रणौत सध्या चर्चेत आहे. नुकतंच तिने कांतारा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे आणि लेखकाचे कौतूक केले आहे. आत ती चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने आपल्या घरातील मंदिराचा जीर्णोद्धार केलाआहे. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
या कार्यक्रमात कंगनाने क्रीम रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या समोर गणपतीची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला झेंडूचे हार फुले, प्रसाद असे पूजेचे साहित्य आहेत. पुरोहितांच्या मार्गदर्शनाने ती पूजा करत आहे. फोटोत ती ध्यान करताना दिसत आहे. तिने याला कॅप्शन दिला आहे ‘या सणासुदीच्या काळात घरातील मंदिराचा जीर्णोद्धार केला’ असे लिहले आहे.
“मी मराठी असल्याने…”; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितल्या दिवाळीच्या गोड आठवणी
कंगना गेले काही महिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/10/kangana-ranaut-2.jpeg?w=264)
आता तिने आणखी एका चित्रपटात दिसणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आलिया भट्टनंतर आता कंगनाही वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचे पात्र साकारताना दिसणार आहे. अलीकडेच तिने याचा खुलासा केला आहे. कंगना रणौतने एक नवीन बायोपिक करणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. या बायोपिकमध्ये ती बंगालमधील थिएटर आर्टिस्ट बिनोदिनी दासी यांची भूमिका साकारणार आहे.