बॉलिवूड अभिनेत्री जशा लूकमुळे चित्रपटांमुळे प्रसिद्ध होतात तशा आजकाल आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे प्रसिद्ध होतात. यातील एक आघाडीचे नाव म्हणजे कंगना रणौत. ती कायमच कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने राजकरणात प्रवेश करणार याबद्दलचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात धाकड गर्ल राजकरणात उतरणार का यावर तिच्या चाहत्यांचे लक्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कंगनाने नुकतंच आजतक या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये कंगनाने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मुलखातकाराने विचारले “बॉलिवूडमध्ये सध्या जे चित्रपट येत आहेत त्यापैकी खूप चित्रपट चालत आहेत. याउलट दाक्षिणात्य चित्रपट हिट होत आहेत. जे असं का होत आहेत याबद्दल तुझे काय मत आहे?’ त्यावर कंगनाने उत्तर दिले ‘कोणताही चित्रपट चालतो किंवा फ्लॉप होतो यावर मोठ्या प्रमाणावर विश्लेषण होते. दाक्षिणात्य चित्रपटात तुम्ही बघाल तर भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रपट बनत आहेत. ‘कांतारा’ त्याचे एक उत्तम उदाहरण आहे.’ PS १’ चित्रपटात दाखवलेली चोला संस्कृती याबद्दल लोकांना कुतूहल आहे. याउलट बॉलिवूड आपल्या संस्कृतीपासून खूप लांब गेलेआहे. बॉलिवूडमधील लोकांनवर पाश्चिमात्य चित्रपटांचा प्रभाव आहे त्यामुळे तशा पद्धतीचे ते चित्रपट बनवत आहेत. म्हणून कदाचित प्रेक्षक त्या चित्रपटांशी जोडले जात नाहीयेत. मीदेखील दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. दाक्षिणात्य लोक त्यांच्या संस्कृतशी जोडले गेले आहेत.”

“भाऊ बहीण वाटतोय ना?” लेकीबरोबर फोटो काढताना बोनी कपूर यांनी फोटोग्राफरना विचारला प्रश्न

कंगना गेले काही महिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘इमर्जन्सी’ चित्रपटानंतर आता कंगनाही वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीचे पात्र साकारताना दिसणार आहे. अलीकडेच तिने याचा खुलासा केला आहे. कंगना रणौतने एक नवीन बायोपिक करणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. या बायोपिकमध्ये ती बंगालमधील थिएटर आर्टिस्ट बिनोदिनी दासी यांची भूमिका साकारणार आहे.