पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे त्यांचा जन्म झाला होता. एका सामान्य कुटुंबातून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७३वा वाढदिवस साजरा करत आहेत. सर्वसामान्य जनता ते सेलिब्रिटी असे सर्वजण आज जगातील लोकप्रिय आणि प्रभावशाली नेत्यांच्या यादीत सामील असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर मोदींवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. बॉलीवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रणौतनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना श्रीरामाशी करत त्यांना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर लवकरच नव्या भूमिकेत; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर पाहायला मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामला एक स्टोरी पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदींचा फोटो शेअर करत तिनं लिहीलं आहे की, “जगातील सर्वात प्रेमळ नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कठोर परिश्रम व दृढनिश्चयाने ते एका उंच शिखरावर पोहोचले आहेत आणि ते एका नव्या भारताचे शिल्पकार बनले आहेत. तुम्ही फक्त पंतप्रधान नाही तर तुमचे नाव प्रभू रामाप्रमाणे राष्ट्राच्या अंतरात्म्यामध्ये कोरले गेले आहे. तुम्हाला दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा.”

हेही वाचा – सुबोध भावेमुळे चिन्मय मांडलेकर सात महिने घरी का बसला होता? नेमकं काय घडलं होतं? वाचा

हेही वाचा – ‘जवान’ फेम संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर करणार लग्न? चर्चांना उधाण

दरम्यान, कंगना व्यतिरिक्त बऱ्याच कलाकार मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेते अनुपम खेर, राजकुमार राव, टायगर श्रॉफ, वरुण धवन, तुषार कपूर, परेश रावल यांनी देखील खास पोस्ट शेअर करत मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kangana ranaut warm wishes to pm narendra modi pps