बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगना तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे बॉलीवूडमध्ये तिचे कोणाशी पटत नाही, असं म्हणतात. चित्रपट निर्माता करण जोहर आणि कंगनामधील वाद जगजाहीर आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कंगनाने आपण करण जोहरशी का भांडतो, यामागचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video : “पर्स आहे की बादली?” नेटकऱ्यांनी उडवली अनन्या पांडेची खिल्ली; म्हणाले, “दाल फ्राय…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

कंगना नेहमी बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर आपलं मत मांडताना दिसते. कंगना जेव्हा जेव्हा या विषयावर बोलते तेव्हा तेव्हा तिने करण जोहरला लक्ष्य केले आहे. कंगनाने तर करण जोहरला घराणेशाहीचा राजा म्हटले आहे. स्टार्स किड्स लाँच करण्याची जबाबदारी करणने उचलली आहे, असे त्याचे मत आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान कंगनाला विचारण्यात आले की, ती करण जोहरशी का भांडते? यावर कंगनाने आपले मत उघडपणे मांडले.

हेही वाचा- Video : “तुमचा मुलगा मला खूप त्रास देतो”; आलिया भट्टने केली फोटोग्राफरच्या आईकडे तक्रार, व्हिडीओ व्हायरल

कंगना राणौतच्या म्हणण्यानुसार ती कोणा एका व्यक्तीविरोधात बोलत नाही तर व्यवस्थेविरोधात बोलत असते. कंगनाचा असा विश्वास आहे की करण जोहर काही लोकांना विशेषाधिकार वाटतो. कंगनाचा विश्वास आहे की स्टार मुलांना कोणतेही कष्ट न करता सहज काम मिळते. ती फिल्मी बॅकग्राऊंडमधून येत नसल्याने तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कंगना म्हणाली, मला इंग्रजी कसं बोलावं हे माहिती नसल्यामुळे माझी खिल्लीही उडवली गेली. मला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. तसेच मी एक लढाई लढत आहे आणि बरेच लोकदेखील या लढाईचा एक भाग आहेत, असेही कंगना म्हणाली.

हेही वाचा- “मी तुझ्या चुका…”; घटस्फोटाच्या चर्चादरम्यान पत्नी आलियाने नवाजुद्दीनची मागितली माफी, म्हणाली, “तुझ्यावरचे सगळे…”

कंगनाने बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या बॉयकॉट ट्रेण्डबद्दलही वक्व्य केले आहे. बॉयकॉटमुळे झालेल्या नुकसानावर कंगना म्हणाली की, देशातील लोकसंख्या लक्षणीय आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत त्याचा फारसा परिणाम होणार नाही. करण जोहरने अनेक स्टार किड्स लाँच केले आहेत. त्यामुळे बॉलीवूडमधील घराणेशाहीवरून कंगना नेहमी करण जोहरला लक्ष्य करीत आली आहे.

Story img Loader