बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना रणौत सध्या चित्रपटसृष्टीपेक्षाही राजकारणाच्या मुद्द्यांमुळे अधिक चर्चेत असते. मुंबईतील ड्रग्स माफियांविरोधात गेल्या काही महिन्यात कंगनाने अनेकदा आवाज उठवला आहे. त्याशिवाय, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तिच्यावर जोरदार टीकादेखील झाली होती. मध्यंतरी कंगनाने तिच्या सोशल मीडियावर तिच्या मनाली येथील घराचे काही फोटो शेअर केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता कंगनाने तिच्या मुंबईच्या घरातील काही फोटो शेअर केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. खासकरून तिच्या घराबाहेर लागलेल्या पाटीने कित्येकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतंच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये कंगना तिच्या मुंबईतील घराचं सुशोभीकरण नेमकं कसं होत आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. यापाठोपाठ कंगनाने तिच्या वहिनीने शेअर केलेला एक फोटो स्वतःच्या स्टोरीवर शेअर केला.

आणखी वाचा : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानने मौन का पाळलं? अभिनेत्याच्या खास मित्राने केला खुलासा

या फोटोमध्ये सगळ्यांचं लक्ष कंगनाच्या घरातील त्या पाटीकडे गेलं. एका खोलीबाहेर आपल्याला एक पाटी पाहायला मिळत आहे ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की, “घुसखोरी करण्यास सक्त मनाई, घुसखोरांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल आणि जे बचावतील त्यांना पुन्हा गोळ्या घालण्यात येतील.” कंगनाच्या घरातील या अजब पाटीची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे.

फोटो : सोशल मीडिया

कंगना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचे अपडेट तिच्या सोशल मिडिया अकाऊंटच्या माध्यमातून देत असते. नुकतंच कंगनाने ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याचं जाहीर केलं. याबरोबरच कंगनाच्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेन वाट बघत आहेत. यात कंगनाने इंदिरा गांधी यांचा प्रवास उलगडून सांगितला आहे. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शनही कंगनानेच केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kangna ranauts mumbai house has weird sign board for trespassers avn