बॉलीवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या ‘जाने जा’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती ओटीटीवर पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्सवर करीनाचा ‘जाने जा’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. हा २१ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच करीनाचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “माझी कंबर…” साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्त्रीने काहीही परिधान केलं तरी…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

करीनाचा हा व्हायरल व्हिडीओ ‘फिल्मी ग्नान’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बेबो रेड आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच इतर महिलांबरोबर ती राष्ट्रगीताला उभी राहिलेली दिसत आहे. मात्र करीनाची राष्ट्रगीताला उभी राहण्याची पद्धत नेटकऱ्यांना खटकली आहे. यावरून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेनं बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर केलं काम, म्हणाली, “तुझ्याबरोबर…”

हेही वाचा – “कॉलेजमध्ये असताना…”, तेजश्री प्रधानचा पहिल्या प्रपोजबद्दल खुलासा, म्हणाली…

या व्हिडीओवरील प्रतिक्रियेत एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “राष्ट्रगीताला सावधान उभं राहतात हाताहात पकडून उभं राहत नाही, हे कोणीतरी हिला सांगा.” तसेच दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “राष्ट्रगीत गाताना सावधान उभं राहतात. स्टार्सला ही गोष्ट माहित नाही, हे खूप लज्जास्पद आहे.” तर तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “जे लोकं शिक्षित नाहीत, त्यांना देखील राष्ट्रगीत गाताना कसं उभं राहतात हे माहित आहे.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचं पहिलं क्रश कोण होतं? जाणून घ्या

दरम्यान, करीनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शेवटची ती ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता तिचे यंदा दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एक म्हणजे ‘जाने जा’ आणि दुसरा ‘The Buckingham Murders’. याशिवाय ‘द क्रू’ चित्रपटातही करीना झळकणार आहे. हा चित्रपट २०२४ प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader