बॉलिवूडमधील स्टार किड्स चित्रपटांमुळे चर्चेत होते मात्र आता बॉलिवूड पार्टींमध्ये ते दिसू लागल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु आहे. बॉलिवूड स्टार किड्स कायमच नेटकाऱ्यांच्या रडारवर असतात त्यातील एक नाव म्हणजे अनन्या पांडे. अनन्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. परंतु तिने काम केलेला एकही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तिचा ‘लाइगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला.
३० ऑक्टोबर १९९८ साली तिचा जन्म झाला. तिचे वडील चंकी पांडेदेखील बॉलिवूडमध्ये सक्रीयआहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री करीना कपूर खानने पोस्ट शेअर केली आहे. हॅलोवीन पार्टीतल्या तिच्या लुकचा फोटो शेअर करत करीनाने कॅप्शन दिला, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टार खूप प्रेम’ असा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“ज्या चित्रपटांना मी आवाज…” अमिताभ बच्चन यांनी ‘लगान’च्या वेळी आमिर खानला दिलेला खास सल्ला
अनन्याच्या फोटोकडे तुम्ही नीट निरखून पहिले तर तिचा लूक ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटातील करीना कपूरच्या व्यक्तिरेखेशी मिळताजुळता आहे. ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटात करीना ग्लॅमर्स अवतारात दिसली होती. तिने साकारलेले ‘पु’ हे पात्र आजही लोकांच्या लक्षात राहिले आहे.
‘लाइगर’ च्या अपयशानंतर अनन्याने आयुष्मान खुरानाबरोबरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. तसेच झोया अख्तर आणि रीमा कागती लिखित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं अनन्याने पोस्ट करत सांगितलं आहे. सध्या ती अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.