Happy Birthday Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

हेही वाचा : “मेरे लिए वही मेरा…” कियारा अडवाणीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पती सिद्धार्थ मल्होत्राबद्दल खुलासा करीत म्हणाली…

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या करिश्मा कपूरने ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘हम साथ साथ है’ असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. २५ जून १९७४ रोजी जन्मलेली करिश्मा कपूर यंदा आपला ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबद्दल सर्वांनाच माहिती आहे परंतु, करिश्मा कपूरला ‘लोलो’ कसे पडले? याबद्दल तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया…

हेही वाचा : मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला दिल्लीत; सेटवरचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर लीक

करिश्मा कपूरला इंडस्ट्रीतील तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि पापाराझी सुद्धा कायम ‘लोलो’ नावाने हाक मारत असल्याचे आपण पाहिले असेल. करिश्माला लोलो का म्हणतात याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. अभिनेत्रीची आई बबिता कपूर हॉलिवूड अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा हिच्या खूप मोठ्या फॅन आहेत. त्यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला ‘लोलो’ हे टोपणनाव दिले.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब कॉफी पार्टनरच्या शोधात, अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

करिश्माने कौटुंबिक परंपरा मोडून आई बबिताच्या पाठिंब्याने इंडस्ट्रीत पदार्पण केले. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून करिश्माने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच हिट चित्रपटानंतर पुढे अभिनेत्रीचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले परंतु, १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटामुळे करिश्माच्या करिअरला कलाटणी मिळून अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये आपली वेगळे ओळख निर्माण केली.

Story img Loader