कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलिवूडमधील नवविवाहित जोडपं कायमच चर्चेत असतं. लग्नानंतर दोघंही एकमेकांवर असणारं प्रेम उघडपणे व्यक्त करताना दिसतात. कतरिनाने तर विकीच्या कोणत्या गोष्टी आवडतात तसेच या स्वतःच्या बेडरुम सिक्रेटबाबतही भाष्य केलं होतं. आता कतरिनाने सासरच्या मंडळींबाबत वक्तव्य केलं आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये कतरिनाने हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं.
आणखी वाचा – Video : गाढ झोपलेल्या नवऱ्याबरोबर कतरिना कैफने केलं असं काही की…; बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘द कपिल शर्मा शो’मध्ये कतरिना तिच्या ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी तिचा खास अंदाज पाहायला मिळाला. कपिलनेही तिला तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबाबत काही प्रश्न विचारले. या सगळ्या प्रश्नांना तिने अगदी हसत उत्तरं दिली.
कपिल या भागामध्ये त्याची आई त्याला टोपण नावाने हाक मारते असं कतरिनाला सांगतो. हे ऐकून कतरिनाही तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत सांगू लागते. तिला सासरकडची मंडळी कोणत्या नावाने हाक मारतात हे कतरिना त्याला सांगते.
आणखी वाचा – “मला रात्री झोप येत नाही तेव्हा…” नवऱ्याविषयी बोलताना कतरिना कैफने उघड केलं बेडरुम सिक्रेट
ती म्हणाली, “माझी सासरकडची मंडळी मला किट्टो नावाने हाक मारतात.” तिच्या या उत्तरानंतर सगळेच हसू लागतात. कतरिना सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामध्ये रमली आहे. ती विकीच्या आई-वडिलांबरोबरही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे फोटो शेअर करताना दिसते. सासरच्या मंडळींनी तिचं ठेवलेलं टोपणनावही फारच गोड आहे.