अभिनेत्री कियारा अडवाणीच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यावर्षी फेब्रुवारीत कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नानंतर अनेकदा कियारा सासूबरोबर फिरताना दिसते. सध्या या सासू-सुनेचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कियाराला रॅम्प वॉक करताना पाहून तिची सासू तिला फ्लाइंग किस देत प्रोत्साहन देताना दिसत आहे.
हेही वाचा : प्राजक्ता माळीने लोकप्रिय अभिनेत्रीला भेट दिला खास दागिना; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला तुझ्या मनातलं…”
कियारा अडवाणीने डिझाइनर फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या ‘इंडिया कॉउचर वीक २०२३’ मध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. यावेळी तिच्या सासूबाई रिमा मल्होत्रा उपस्थित होत्या. रॅम्प वॉक करताना सासूबाईंनी लाडक्या सुनेला प्रोत्साहन दिले. हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक करताना कियारा फारच सुंदर दिसत होती. यावेळी सिद्धार्थ मल्होत्राची आई रिमा मल्होत्रा यांनी सुनेला फ्लाइंग किस दिली. त्या प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या. हा शोचे आयोजन दिल्लीत करण्यात आले होते. सध्या सासू-सुनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी दोघींमध्ये असलेल्या गोड नात्याचे कौतुक केले आहे. एका युजरने व्हिडीओवर “सासूबाई हव्या तर अशा…” अशी कमेंट केली असून, दुसऱ्या एका युजरने “सिद्धार्थच्या आईचा कियारा खूप आदर करते” अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे.
हेही वाचा : ‘बिग बॉस’नंतर अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने पहिल्यांदाच केले ऑनस्क्रीन एकत्र काम, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
दरम्यान, अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. जैसलमेरला सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला होता. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर लवकरच अभिनेत्री कियारा अडवाणी ‘वॉर २’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत.