काही वर्षातच अभिनेत्री कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या चित्रपटांमुळे, तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिचा ‘जुग जुग जियो’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तिचे एका पाठोपाठ एक चित्रपट येत आहेत. तिच्या कामाचा गौरव करण्यात आला आहे. लोकमत अवॉर्डमध्ये तिला ‘लोकमत महाराष्ट्रीयन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे हा पुरस्कार तिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला आहे.
प्रतीक्षा संपली! सिद्धार्थ कियारा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर
याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिने माहिती दिली आहे ज्यात तिने लिहले आहे, ‘मी लहानाची मोठी या महाराष्ट्रात झाली आहे. मला लोकमत महाराष्ट्रीयन अवॉर्ड हा पुरस्कार माननीय नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांच्या हस्ते मिळाल्याने मी मनापासून आभारी आहे’. लोकमतचे खूप खूप आभार या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. पुरस्कार स्वीकरल्यानंतर तिने मराठीत दोन शब्द म्हंटले, या पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे सत्कार करण्यात आले.
कियारा अडवाणीने २०१४ मध्ये ‘फग्ली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असताना, कियाराने नीरज पांडे यांच्या एम. एस. धोनी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतबरोबर दिसली होती.
कियारा अडवाणी सध्या आपल्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटात व्यस्त आहे. मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस या दिग्दर्शन करत आहे. या चित्रपट तिच्याबरोबर कार्तिक आर्यन झळकणार आहे. सध्या तिच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याला ती डेट करत आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहे.