फरहान अख्तरने ‘डॉन ३’ची घोषणा केल्यानंतर सगळेच फार उत्सुक झाले होते. चाहत्यांची ही उत्सुकता मात्र एका क्षणात रागात बदलली जेव्हा या तिसऱ्या भागात मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंहला घेतल्याचं स्पष्ट झालं. प्रेक्षकांना या भूमिकेसाठी रणवीरची निवड अजिबात पटलेली नसून त्यांनी यावर टीकादेखील केली. यानंतर ‘डॉन ३’मध्ये रणवीरच्या बरोबरीने कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा रंगू लागली. बऱ्याच अभिनेत्रींची नावं समोर आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डॉन’ची जंगली बील्ली म्हणजेच प्रियांका चोप्रा या तिसऱ्या भागात दिसणार अशीही चर्चा होती. आता या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ‘डॉन ३’बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. खुद्द फरहान अख्तरने खास व्हिडीओ शेअर करत या चित्रपटात रणवीरसह झळकणाऱ्या अभिनेत्रीचा खुलासा केला आहे.

आणखी वाचा : १७ व्या वर्षी भावाने स्वीकारला इस्लाम अन् वडील चर्चमध्ये…; विक्रांत मेस्सीने कुटुंबियांबद्दल केला मोठा खुलासा

‘डॉन ३’मध्ये रणवीरच्या बरोबरीनेच अभिनेत्री कियारा अडवाणी झळकणार आहे. नुकतंच ‘डॉन युनिव्हर्स’मध्ये कियाराची एंट्री झाल्याची अधिकृत घोषणा फरहानने एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. “डॉन युनिव्हर्समध्ये कियारा अडवाणीचं स्वागत आहे, एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.” असं लिहून व्हिडीओ शेअर करत फरहानने ही घोषणा केली आहे. सोशल मीडियावर यावरुन जबरदस्त चर्चा होत आहे.

प्रेक्षक या धमाकेदार ब्लॉकबस्टर जोडीला एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी फारच उत्सुक असल्याचं त्यांनी कॉमेंट करत लिहिलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर आणि कियारा प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. हा नव्या पिढीचा डॉन असल्याने यामध्ये शाहरुख ऐवजी नवा तरुण चेहेरा घेतल्याचं मध्यंतरी फरहानने स्पष्ट केलं होतं. आता कियाराच्या एंट्रीने प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री कशी असेल हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kiara advani to be part of don 3 confirms farhan akhtar avn