कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कियारा कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. त्यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कियारा नव्या कोऱ्या आलिशान कारमधून उतरताना दिसत आहे. या व्हिडीओवरून कियाराने नवी कार खरेदी केली असल्याचे बोलले जात आहे.
कियाराच्या नवीन कारबद्दल बोलायचे झाले तर ती मर्सिडीज-बेंझ मेबॅच एस-क्लास आहे. या कारची किंमत २.६९ कोटी ते ३.७३ कोटी दरम्यान आहे. या कारला ३९८२ ते ५९८० cc पॉवर इंजिन आणि टॉर्क आहे.
‘सत्यप्रेम की कथा’च्या माध्यमातून कार्तिक आणि कियारा दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. यापूर्वी कार्तिक आणि कियारा ‘भूलभुलैया २’ मध्ये एकत्र दिसले होते. ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात कियारा आणि कार्तिकशिवाय सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मिती सावंत आणि शिखा तलसानिया हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा- प्रसूतीनंतर अवघ्या १० दिवसात १० किलो वजन कसं कमी केलं? गौहर खानचं डाएट रुटीन एकदा वाचाच!
कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल अधिक बोलायचे तर ती राम चरणसोबत ‘गेम चेंजर’ या तेलगू चित्रपटातही दिसणार आहे. विशेष म्हणजे रामचरणबरोबरचा कियाराचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विनय विद्या राम’मध्ये कियाराने रामचरणबरोबर पहिल्यांदा काम केले होते.