बॉलीवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर नेहमी चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असते. करीनाच्या कामाबद्दल जितकं बोललं जात तितकंच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोललं जात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री तिच्या लव्ह लाईफविषयी बोलली आणि लग्नाआधी ५ वर्ष सैफ अली खानबरोबर लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती, याचा करीनाने खुलासा केला.

हेही वाचा – Video: आदर्श शिंदेच्या लेकीनं काकाच्या जोडीनं बनवला किल्ला; उत्कर्ष व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “माझी पुतणी…”

२००४ साली अभिनेता सैफ अली खान पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंहबरोबर तलाक घेऊन विभक्त झाला. त्यानंतर तीन वर्षांनी सैफच्या आयुष्यात करीनाची एन्ट्री झाली. २००७ साली सैफ आणि करीना ‘टशन’ चित्रपटात काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही वर्षानंतर लग्नबंधनात अडकले. पण त्याआधी दोघं ५ वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते. याबाबत करीनाने ‘डर्टी मॅगजीन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

करीना कपूर म्हणाली, “आपल्या एक बाळ हवं असतं म्हणून आज आपण लग्न करतो, बरोबर ना? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की, आज आपण लग्नाविना ही राहू शकतो. आम्ही ५ वर्ष लिव्ह-इन मध्ये राहिलो होतो. त्यानंतर आम्हाला बाळ पाहिजे होतं म्हणून आम्ही पुढचं पाऊल उचललं.”

हेही वाचा – ‘या’ चिमुकल्यांना ओळखलंत का? सध्या प्रेक्षकांच्या मनावर गाजवतायत अधिराज्य

पुढे मुलांच्या संगोपनाविषयी बोलताना करीना म्हणाली की, आम्ही दोघांना समान वागणूक देतो. त्यांना जसं राहायचं आहे, आम्ही तसंच त्यांना राहायला देतो. ते स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात. माझं जे काही आयुष्य आहे, त्याप्रमाणे मी त्यांच्या समोर जगते. मला त्यांच्याबरोबर सर्व काही करायचं आहे. आपण आनंदी राहायला हवे, तरच त्यांची भरभराट होईल.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय व शाहरुख खान रुपेरी पडद्यावर घालणार धुमाकूळ; दिग्दर्शक अ‍ॅटलीने आगामी चित्रपटाची केली घोषणा

दरम्यान, सैफ अली खान आणि करीना कपूरला दोन मुलं आहेत. २०१६ मध्ये करीनाने तैमूरला जन्म दिला होता. त्यानंतर २०२१ला करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव जेह अली खान असं आहे.

Story img Loader