‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांवर प्रश्न उपस्थित करीत, सोशल मीडियावर‘आदिपुरुष’चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. या वादादरम्यान, क्रिती सेनॉनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “तुम क्या मिले…” रणवीर-आलियाचा रोमँटिक अंदाज, बहुचर्चित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अभिनेत्री क्रिती सेनॉनने ‘आदिपुरुष’ चित्रपटात जानकी (सीता) ही भूमिका साकारली आहे. ‘आदिपुरुष’च्या वादावर क्रितीने उघडपणे प्रतिक्रिया दिली नसली, तरी अभिनेत्रीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने अप्रत्यक्षपणे टोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. चित्रपटगृहातील व्हिडीओ शेअर करीत क्रितीने, “माझे लक्ष फक्त टाळ्यांचा कडकडाट आणि जयजयकार करणाऱ्या घोषणांवर आहे…जय श्री राम”, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा : “प्रेम, लग्न, घटस्फोट” बिग बॉसमध्ये आलिया सिद्दिकीने केला नवाजुद्दिनबद्दल खुलासा; म्हणाली, “आता माझा लग्नावर विश्वास…”

‘आदिपुरुष’ चित्रपट अनेक कारणांमुळे वादात अडकला आहे. हनुमानजी यांची भूमिका साकारत असलेल्या देवदत्त नागे याचा चित्रपटातील ‘जलेगी तेरे बाप की’ हा डायलॉग सध्या वादग्रस्त ठरत आहे. ‘रामायण’वर आधारित चित्रपटात असे टपोरी स्टाईल संवाद असल्याने लोक प्रचंड संतापले आहेत. हनुमानाशिवाय रावणाचे (सैफ अली खान) पात्रही लोकांना आवडले नाही.

हेही वाचा : “…म्हणून मी मालवणी बायको केली” ‘त्या’ प्रश्नावर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

‘आदिपुरुष’ला विरोध होत असला तरी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात ३४० कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने रामाची, तर क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. सनी सिंग लक्ष्मणाची, तर हनुमानाची भूमिका देवदत्त नागेने साकारली आहे. भूषण कुमार निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून पटकथा मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहे.