अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. क्रितीने नुकतेच बॉलीवूडमध्ये ९ वर्ष पूर्ण केले आहेत. या ९ वर्षामध्ये क्रितीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, अभिनय क्षेत्रात येण्यासाठी क्रितीला खूप कष्ट घ्यावे लागले. अभिनेत्री बनण्याच्या तिच्या निर्णयाला नातेवाईकांनीच विरोध केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने कसं कमी केलं वजन? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बरोबर ६ आठवड्यांनी…”

क्रितीने एका मुलाखतीदरम्यान क्रितीने अभिनेत्री बनताना आलेल्या समस्यांवर भाष्य केलं आहे. क्रिती म्हणाली, “जेव्हा मी अभिनेत्री बनायचे ठरवले तेव्हा माझ्याच नातेवाईकांनी मला अनेक गोष्टी ऐकवल्या. अभिनेत्री बनणं ही मोठी गोष्ट आहे. मी हे करु शकणार नाही असं त्यांना वाटलं होतं.” एवढचं नाही तर अभिनेत्री बनली तर तुझं लग्न होणार असा इशाराही अनेकांनी क्रितीला दिला होता.

हेही वाचा- कतरिना कैफसह २० वर्षे काम करणारी ‘ती’ व्यक्ती कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्यासाठी ते अनेकदा रडले…”

क्रिती पुढे म्हणाली, “जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. मी कुणाला ओळखतही नव्हते. मी पूर्ण भांबावले होते. कुणाला भेटायचं? सुरुवात कशी करायची? याबद्दलही मला काहीच माहिती नव्हतं. जर मी चित्रपट कुटुंबातून आलो असते, तर ते लोक मला आधीच ओळखत असले असते. अनेकदा तर चित्रपटांमधील माझी जागा स्टारकिड्सना देण्यात आली. त्यामुळे माझी चिडचिडही व्हायची.”

क्रितीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ‘आदिपुरुष’ चित्रपटात क्रितीने सीतेची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील संवाद आणि काही दृष्यांवरुन मोठा वादही निर्माण झाला होता. आदिपुरुष’नंतर क्रिती लवकरच शाहिद कपूरबरोबर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, निर्मात्यांनी या रोमॅंटिक चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. क्रितीने आता स्वतःची चित्रपट निर्मात्या कंपनीची घोषणा केली आहे. तिने ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असं कंपनीचं नाव ठेवलं आहे. नुकतचं क्रितीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबची माहिती दिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kriti sanon talk about her struggle life in film industry dpj