Kubbra Sait On Abortion: ‘सेक्रेड गेम्स’, ‘जवानी जानेमन’, ‘देवा’ आणि ‘रेडी’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री कुब्रा सैत ओळखली जाते. कुब्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. वन नाईट स्टँडनंतर कुब्रा गरोदर राहिली आणि नंतर तिने स्वतः जाऊन गर्भपात केला होता, याबाबतही तिने सांगितलं. कुब्रा आणखी काय म्हणाली ते जाणून घेऊया.
कुब्रा सैतचा गर्भपाताबद्दल खुलासा
कुब्रा सैत ‘वन नाइट स्टँड’नंतर गरोदर राहिली होती, तिने त्या बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आणि गर्भपात केला. बॉलीवूड बबलशी बोलताना कुब्रा म्हणाली, “जेव्हा मी गर्भपाताच्या प्रक्रियेतून गेले तेव्हा मला जाणवलं की मी अजिबात मजबूत नाही. त्या बाळाला जन्म देण्यासाठी मी खूप कमकुवत आहे, असं मला वाटत होतं. गर्भपात केला नसता तर मी त्या बाळाला जन्म देऊन त्याच्याबरोबर जगेन असे म्हणण्याचे धैर्य किंवा हिंमत माझ्यात नव्हती. त्यावेळी मला खूप पोकळ वाटत होतं. मी खूप कमकुवत होते.”
“मग मी स्वतःसाठी एक निर्णय घेतला. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले आणि मी तो स्टिरियोटिपिकल पॅटर्न मोडला, ते सामाजिक बंधन तोडले आणि कोणालाही त्याबद्दल माहिती नव्हती. त्यानंतर मी स्वत: गर्भपातासाठी गेले आणि कोणालाही सांगितलं नाही,” असं कुब्रा सैतने सांगितलं.
नितेश तिवारींच्या ‘रामायण’चा भाग नाही कुब्रा
मुलाखतीत कुब्रा सैतने हे देखील स्पष्ट केलं की ती रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या नितेश तिवारींच्या ‘रामायण’ या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणार नाही. ती यासाठी योग्य निवड ठरली असती, परंतु तिला सिनेमात घेण्यात आलं नाही. मात्र, ही भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेत कोण असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कुब्रा म्हणाली की तिने या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, परंतु तिला भूमिका मिळाली नाही.