९० च्या दशकात सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरीने बॉलीवूडमध्ये जरी काम केलं तरीही ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपली मुलं आणि नवऱ्याबरोबरच फोटो शेअर करत ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडीची माहिती देत असते. नुकताच माधुरीने तिच्या नवऱ्याबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे. यात श्रीराम नेने यांनी आपली कशी फजिती केली याबाबत माधुरीने सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- बिगबॉस ओटीटी होस्ट करताना सलमान खानने सगळ्यांसमोर ओढली सिगारेट? फोटो व्हायरल

एका मुलाखतीत माधुरीने हा किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, “आपल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक रोमँटिक सीन केले जातात. त्यातील एक म्हणजे मुलगी पायात पैजण घालते आणि त्या पैंजणाचा आवाज करुन मुलासमोरुन जाते. त्या आवाजाने मुलगा तिला शोधू लागतो आणि त्याला बघून ती पळून जाते. एकेदिवशी असंच मी करण्याचा प्रयत्न केला. माझे मिस्टर कम्प्यूटरवर काहीतरी काम करत होते. मी पैजण घातले आणि मुद्दाम त्यांच्याबाजूने काहीना काही काम करण्याच्या बहाण्याने फिरू लागले.”

माधुरी पुढे म्हणाली, “मी विचार केला हे काहीच का बोलत नाहीयेत. तेवढ्यात ते माझ्यावर ओरडले. म्हणाले, तो आवाज बंद कर. तू फिरत असताना कसला आवाज येतोय? मला फोकस करता येत नाहीये. आणि त्यांनी माझ्या रोमँटिक मूडची फजिती केली.”

माधुरी आणि श्रीराम नेने यांच लग्न कसं झालं?

माधुरी लॉस एंजेलिसला भावाला भेटायला गेली होती. तिथे तिची भेट श्रीराम नेनेंशी झाली. तेव्हा श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती. यानंतर त्यांच्या भेटी- गाठी होत गेल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी माधुरीने लग्न केले. माधुरीला दोन मुले आहेत. अनेक वर्ष परदेशात संसार केल्यानंतर माधुरी आता भारतात स्थायिक झाली आहे. लग्नानंतर माधुरी चित्रपटसृष्टीपासून लांब गेली होती. मात्र, आता भारतात परतल्यानंतर तिने पुन्हा आपल्या कामास सुरुवात केली आहे.