बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा हिचं नाव घेतलं जातं. कधी तिची फॅशन असो अथवा तिचं वागणं; ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरते. तर आता एअरपोर्टवर घडलेल्या एका प्रकारामुळे ती चिडली.
सेलिब्रेटी वरचेवर एअरपोर्टवर स्पॉट होत असतात. आपला आवडता बॉलिवूड स्टार एअरपोर्टवर दिसल्यावर चाहते त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याजवळ जातात. पण अनेकदा चाहत्यांचा उत्साह सेलिब्रिटींना त्रासदायक ठरतो. असंच काहीसं आता मलायकाच्या बाबतीतही घडलं आहे.
आणखी वाचा : “…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं कारण
गुरुवारी सकाळी मलायका मुंबई विमानतळावर आली. ती आल्याचा कळताच तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यातील अनेकांना मलायकाबरोबर फोटो काढायचा होता. तर तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठीचा चाहत्यांनी प्रयत्नही केला. परंतु त्यातील काही जण फोटो काढण्यासाठी मलायकाजवळ आलेले दिसले. ते अचानक जवळ आल्यावर मलायका अनकम्फर्टेबल झाली आणि म्हणाली, “आराम से…” चाहत्यांच्या अशा वागण्याने मलाईका चिडली होती. ती थेट तिथून निघून गेली.
आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी मलायकाची बाजू घेत चाहत्यांच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.