बॉलिवूडमध्ये बोल्डनेससाठी अनेक अभिनेत्री प्रसिद्ध आहेत. सत्तर ऐंशीच्या दशकांत परवीन बाबी, झीनत अमान ते आजतागायत दीपिका, जॅकलिनसारख्या अभिनेत्री ज्यांच्या बोल्डलुकमुळे प्रेक्षक घायाळ होतात. अभिनेत्री मल्लिका शेरावतने ‘मर्डर’ चित्रपटातून बोल्डनेसची व्याख्या बदलून टाकली. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी चाहत्यांच्या संपर्कात असते. बॉलिवूडमधील सत्य परिस्थितीबाबतदेखील ती खुलेपणाने बोलताना दिसते. ‘मर्डर’ चित्रपटाच्यानंतर तिला टीकेचा सामना करावा लागला होता. याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

‘बॉम्बे जर्नी’ या कार्यक्रमात नुकतीच ती येऊन गेली आहे. या चित्रपटात तिने मुंबई शहराबद्दल, आपल्या संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. ती असं म्हणाली ‘मला फिलॉसॉफी या क्षेत्रात काम करायचे होते, मी याच विषयातून पदवी संपादन केली आहे. मी अनेक पुस्तके वाचली आहेत. मी २००४ साली पदार्पण केले तेव्हाच काळ वेगळा होता. त्याकाळात माझ्याबाबतीत अनेक उलटसुलट चर्चा झाली. माझ्या बोल्ड सीन्सवरून मला जज करण्यात आले. माझ्याकडे त्या पद्धतीची अभिनेत्री म्हणून बघू लागले. मी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढले आहे, हे कोणालच माहिती नाही. काही माध्यमांनी फक्त माझ्या बोल्डनेस, कपड्यावर लिहले आहे. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. मला साडीत आवडते, मला समुद्रावर बिकिनी घालायला आवडते. स्त्रियांना माझ्याबाबतीत खूप समस्या होत्या मात्र पुरुषांना माझ्याबाबतीत कोणत्याच समस्या नव्हत्या, भारतातल्या पुरुषांनी माझ्यावर प्रेम केलं आहे’.

raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
sonu sood on income tax raid
सोनू सूद आयकर विभागाने घरावर केलेल्या छापेमारीबद्दल झाला व्यक्त; म्हणाला, “माझ्या घरातील कपाटं आणि दरवाजांना…”
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”

चित्रपट असो किंवा लग्न मुलगी कायम… ” हुमा कुरेशीने खंत व्यक्त केली

मल्लिका आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि परखड मतांमुळे चर्चेत असते. एका मुलाखतीदरम्यान मल्लिकाने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बॉलिवूडमधील कास्टिंग काउच आणि त्यादरम्यान मल्लिकाला आलेला अनुभव तिने सांगितला होता. तिने हॉलिवूडमध्येदेखील काम केले आहे.

मल्लिकाने २००३ मध्ये ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन्स दिले. त्यानंतर तिने ‘मर्डर’ या चित्रपटात काही बोल्ड सीन्स दिले. पण बोल्ड सीन्समुळे तिच्यावर नेहमी टीका झाली. काही दिवसांपूर्वी मल्लिका ही ‘नकाब’ या सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिल्यामुळे तिची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती.

Story img Loader