प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने ९०च्या दशकातील काळ गाजवला. ‘तिरंगा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या ममताच्या अभिनयाबरोबरच सौंदर्याचीही भुरळ चाहत्यांना पडली होती. दिलखेचक अदा व ग्लॅमरस अंदाजात ममताने प्रेक्षकांना घायाळ करुन सोडलं होतं. तिचे लाखो दिवाने होते. प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ममता कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे.

तिरंगानंतर ममताने आशिक आवारा, करण अर्जुनसारख्या सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केलं. ९०च्या दशकातील टॉपच्या अभिनेत्रींपैकी ती एक होती. त्यामुळेच ममताला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. परंतु, त्यातील काहीच चित्रपटांसाठी तिने होकार दर्शविला. बहुंताश चित्रपटांना नकार दिल्याने ममताला बॉलिवूडमधील रिजेक्शन क्वीन म्हटलं जायचं. १९९३साली प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ममताने स्टारडस्ट या मॅगजीनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं.

Illegal drug stock worth 25 lakhs seized in Lonar
खळबळजनक! लोणार येथे २५ लाखांचा अवैध औषधसाठा जप्त; कामोत्तेजक, गर्भपात…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Margashirsha Purnima 2024 15 december horoscope marathi
१५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळेल नोकरी, व्यवसायात यश
Umesh Kamat
“एक ठरवलंय या वाढदिवसाला…”, उमेश कामत काय म्हणाला? पत्नी प्रिया बापटने शेअर केला व्हिडीओ
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

हेही वाचा>> “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉय यांची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत, स्मृती इराणी कमेंट करत म्हणाल्या…

ममताने केलेल्या टॉपलेस फोटोशूटमुळे वादही निर्माण झाला होता. अश्लीतता पसरवल्याचा ठपका ठेवत तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. १५ हजार रुपयांच्या जामिनावर तिची सुटका झाली होती. याप्रकरणामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. या प्रकरणानंतर ममताला अधिक लोकप्रियता मिळून तिच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली होती.

हेही वाचा>> राघव चड्ढा यांच्याबरोबरच्या लग्नाच्या चर्चांबाबत परिणीती चोप्राची स्पष्ट प्रतिक्रिया, म्हणाली, “माझ्याबद्दल…”

बॉलिवूडमधील करिअरप्रमाणेच ममताचं वैयक्तिक आयुष्यही प्रचंड चर्चेत होतं. अंडरवर्ल्ड छोटा राजनबरोबर तिचं नाव जोडलं गेलं होतं. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याने ममताला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शकांना धमकवण्यातही यायच्या चर्चा होत्या. २००२ साली ममताने ड्रग्ज माफिया विकी गोस्वामीबरोबर लग्नागाठ बांधली. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर ममता पतीबरोबर केनियाला स्थायिक झाली होती. एका ड्रग्ज केसमध्ये विकी गोस्वामीचं नाव आल्यानंतर ममता पुन्हा चर्चेत आली होती.

नखरेल अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी ममता सध्या साध्वीचं जीवन जगत आहे. तिने तिच्या आयुष्यावर आत्मकथाही लिहिली आहे. ‘ऑटोबायोग्राफी बाय योगिनी’ असं तिच्या पुस्तकाचं नाव आहे.

Story img Loader