Sonakshi Sinha Wedding: ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक, बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. बऱ्याच काळापासून डेट करत असलेला बॉयफ्रेंड जहीर इकबालबरोबर लग्नगाठ बांधण्यासाठी सोनाक्षी तयार झाली आहे. आज सोनाक्षी व जहीरचं नोंदणी पद्धतीने लग्न होणार असून रात्री मोठा रिसेप्शन सोहळा असणार आहे. त्यामुळे दोघांच्या लग्नाबद्दल सतत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये मल्लिकाजान मनीषा कोईरालाने सोनाक्षीसाठी पाठवलेली खास भेटवस्तू पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनीषा कोईरालाने सोनाक्षी सिन्हासह संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. या सीरिजमधील दोघींच्याही कामाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं. यानिमित्ताने मनीषा व सोनाक्षी अनेक कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. तसंच दोघीचं बॉन्डिंग देखील दिसलं होतं. काल, २२ जुलैला मनीषाने लग्नाच्या एक दिवसाआधी सोनाक्षीसाठी खास भेटवस्तू पाठवली. त्याच्याबरोबर पुष्पगुच्छ देखील होता. याचा व्हिडीओवर ‘फिल्मी ग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावरील अर्धवटराव व आवडाबाईचा डान्स पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती मनीषा कोईरालाने पाठवलेली भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ सोनाक्षीच्या ‘रामायण’ नाव असलेल्या निवासस्थानी नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मनीषा कोईराला स्वतः येणार नाही का?”, “सोनाक्षीला पाठवलेल्या भेटवस्तूमध्ये चित्र असू शकत”, “सोनाक्षीला नवरीच्या लूकमध्ये पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत”, अशा समिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे समीर विद्वांस लवकरच चढणार बोहल्यावर; ‘या’ मराठी कलाकारांनी केलं केळवण

लग्नानंतर सोनाक्षी धर्म बदलणार का?

सोनाक्षीचे होणारे सासरे इकबाल रतनसी म्हणाले, “लग्न ना हिंदू पद्धतीने होणार आहे, ना मुस्लिम पद्धतीने होणार आहे. हे नातं म्हणजे दोन हृदयांचं मिलन आहे. याचा धर्माशी काहीही संबंध नाही. दोघं नोंदणी पद्धतीने लग्न करणार आहेत.” दरम्यान, सोनाक्षीने रिसेप्शन सोहळ्यासाठी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण दिलं आहे. या सोहळ्याला सलमान खान, त्याचं कुटुंब, ‘हीरामंडी’ सीरिजमधील सर्व कलाकारांसह बॉलीवूडचे बरेच सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांचं लक्ष सोनाक्षीच्या लग्नाकडे लागलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress manisha koirala send gift to sonakshi sinha of her wedding pps