बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही चित्रपटात फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती बरीच सक्रिय आहे. चित्रपटापासून फारकत घेतल्यावर तिने काही रीयालिटि शोमध्ये परीक्षकाची भूमिकाही बजावली होती. बोल्ड हॉट फोटोज आणि बेधडक वक्तव्यं यासाठी नेहा जास्त ओळखली जाते. नेहा सध्या पुन्हा चर्चेत आहे. आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट केली आहे.

गेल्यावर्षी ३ ऑक्टोबरला नेहा आणि अंगद यांना दूसरा मुलगा झाला होता. त्याचं नाव त्यांनी गुरीक सिंग धुपिया बेदी असं ठेवलं होतं. आपल्या लाडक्या मुलाबरोबरचे काही सुंदर फोटो नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. यामध्ये नेहाने लिहिलं आहे की, “आमच्या लाडक्या बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू तुझ्या आईला समोरच्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करायला शिकवलंस. माझं म्हणजेच या आईचं काळीज हे कायम तुझ्यापाशीच असेल आणि सदैव राहील.”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो

आणखी वाचा : ‘आशिकी’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेला राहुल रॉय म्हणाला, “आशिकी ३ साठी कार्तिक आर्यनला…”

नेहाच्या या पोस्टवर सबा अली खान, महिप कपूर, सोफी चौधरी अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॉमेंट करत गुरीकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेस. नेहा दुसऱ्यांदा गरोदर असताना तिने ‘अ थर्सडे’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं, त्यातही तिची भूमिका एका गरोदर पोलिस ऑफिसरची होती. गुरीकला जन्म दिल्यावर लगेचच नेहाने पुन्हा तिचं काम सुरू केलं आहे.

नेहाने अभिनेता अंगद बेदी याच्याशी लग्न केलं. त्यांना ३ वर्षांची एक गोड मुलगीदेखील आहे जिचं नाव त्याने मेहेर ठेवलं आहे. मध्यंतरी नेहा आणि अंगद यांनी मेहेरचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले, जे चांगलेच व्हायरल झाले होते. नेहा ‘रोडीज’ या शोमुळेही कायम चर्चेत असते. नेहाचा पती अंगद बेदी हा त्याच्या ‘पिंक’ आणि ‘इनसाइड एज’मधील भूमिकांसाठी जास्त लोकप्रिय आहे.

Story img Loader