मंगळवारी (४ जून रोजी) लोकसभा निवडणुकाच्या निकालांची घोषणा झाली. या निवडणुकीत अनेक बॉलीवूड, दाक्षिणात्य व भोजपुरी कलाकारांनी नशीब आजमावलं. यापैकी हेमा मालिनी, कंगना रणौत, रवी किशनसह काहींना यश आलं, तर काहींना जनतेने नाकारलं. बॉलीवूड अभिनेत्री नेहा शर्माचे वडील अजित शर्मा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले होते, पण त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. अजित शर्मा जेडीयूचे उमेदवार अजय मंडल यांच्याकडून पराभूत झाले.

किती मतांनी पराभूत झाले अजित शर्मा

नेहा शर्माचे वडील अजित शर्मा हे काँग्रेसचे उमेदवार होते. ते बिहारच्या भागलपूर मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. या जागेवर जेडीयूचे उमेदवार अजय मंडल यांनी अजित शर्मा यांचा पराभव केला. अजित शर्मा यांना २ लाख १३ हजार ३८३ मतं मिळाली. तर जेडीयूचे अजय मंडल यांना २ लाख ७९ हजार ३२३ मतं मिळाली.

“रंगाबिल्लाचा माज ठेचला गेला”, निकालांबद्दल किरण मानेंची पोस्ट

नेहा शर्माने वडिलांसाठी केला होता प्रचार

निवडणुकीदरम्यान नेहा शर्माने वडील अजित शर्मा यांचा जोरदार प्रचार केला होता. मात्र अभिनेत्रीची लोकप्रियता आणि प्रचारही वडिलांना विजय मिळवून देऊ शकला नाही. नेहा शर्माला तिच्या वडिलांच्या पराभवाचा धक्का बसला आहे, मात्र तिने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या समर्थकांचे आभार मानले आहेत.

How is the Josh? स्मृती इराणींची पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया

नेहा शर्माची पोस्ट

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट केली आहे. “आमच्यासाठी हा कठीण दिवस होता पण आम्ही खूप चांगले लढलो. ज्यांनी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना मतदान केले त्या सर्वांची मी खूप आभारी आहे,” असं तिने लिहिलं. इतकंच नाही तर तिने हिंदीतील काही ओळीही तिच्या पोस्टमध्ये शेअर केल्या. “सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो, तुम निडर डरो नहीं , तुम निडर डटो वहीं, वीर तुम बढ़े चलो! धीर तुम बढ़े चलो!” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेहा शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी

राज्यात भाजपाचा पराभव का झाला? रामदास आठवलेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “उद्धव ठाकरे व शरद पवारांना…”

नेहा शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकत्याच आलेल्या ‘इलिगल ३’ या कोर्टरूम ड्रामामध्ये दिसली होती. या सीरिजचं दिग्दर्शन साहिर रझा यांनी केलं आहे. यात अक्षय ओबेरॉयसह कुब्ब्रा सैत, आशिमा वरदान, इरा दुबे यांच्या भूमिका आहेत. . ती ‘शायनिंग विथ द शर्मा’ मध्ये देखील दिसली होती आणि सध्या ती तिच्या आगामी सस्पेन्स थ्रिलर ‘३६ डेज’ च्या रिलीजमध्ये व्यग्र आहे.