बॉलिवुडमधील आघाडीची नृत्यांगना म्हणून नोरा फतेहीचे नाव घेतले जाते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होत असते. तिच्या नृत्याचं खूप कौतुक होत असतं. पण तरीही ती आतापर्यंत कधीही महत्वपूर्ण भूमिकेत झळकली नाही. आता त्यावर तिने मौन सोडत खंत व्यक्त केली आहे.

नोराने आतापर्यंत ‘बाटला हाऊस’मधील ‘ओ साकी साकी’, ‘थँक गॉड’मधील ‘माणिके’ या गाण्यांमध्ये तिच्या नृत्याची झलक दाखवली आहे. पण आता तिच्या याच नृत्यकौशल्यामुळे निर्माते तिला अभिनयसाठी विचारणा करत नाहीत असा आरोप तिने निर्मात्यांवर केला आहे.

आणखी वाचा : प्रेमभंग झाल्यानंतरचा अनुभव शेअर करताना नोरा फतेहीला अश्रू अनावर; म्हणाली, “त्यावेळी मी…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोरा फतेहीने कोणाचेही नाव न घेता तिला मुख्य भूमिका मिळाल्या नसल्याबद्दल राग व्यक्त केली. ती म्हणाली, “फक्त चारच मुली चित्रपट करत आहेत आणि त्याच चौघींना सतत नवनवीन प्रोजेक्ट मिळत आहेत. मी डान्स करते त्यामुळे निर्माते मला कास्ट करू इच्छित नाहीत असं मला वाटत नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या छान डान्स करतात. त्यामुळे अभिनेत्री असणं हा पॅकेजचाच एक भाग आहे.”

हेही वाचा : Video: कंगना रणौत लवकरच होणार विवाहबद्ध? लग्नपत्रिका देतानाचा व्हिडीओ व्हायरल

पुढे ती म्हणाली, “आजच्या काळात इंडस्ट्रीत स्पर्धा वाढली आहे. वर्षभरात मोजकेच चित्रपट आले आहेत. चित्रपट निर्माते त्यांच्या स्वतःच्या कल्पनेपलीकडे त्यांच्या समोर काय आहे हे बघतच नाहीत. ते फक्त ४ मुली घेऊनच चित्रपट करतात. त्याच चार जणींना आलटून पालटून काम मिळत आहे. चित्रपट निर्मात्यांनाही त्याच चार अभिनेत्री आठवतात. त्या पलीकडे जाऊन ते अजिबात विचार करत नाहीत. त्या चौघींनाच्या व्यतिरिक्त पाचवं नाव तुमचं निर्माण करून रोटेशनमध्ये देखील सामील व्हायला हवं. हे काम अवघड आहे पण नक्की पुर्ण होईल आणि त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मला फक्त स्वतःला सिद्ध करायचे आहे. हे पुढचे आव्हान आहे.”

Story img Loader