भारतात क्रिकेटबरोबरच फुटबॉलचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. कित्येक क्रीडाप्रेमी रात्री जागून हे सामने बघतात आणि त्याचा आनंद लुटतात.फिफा विश्वचषक, जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक, कतारमध्ये लवकरच सुरू होणार आहे. सगळेच क्रीडाप्रेमी यासाठी खूप उत्सुक आहेत. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला जात आहे. तसेच फिफा विश्वचषक प्रथमच नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळवला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ देशांचे संघ सहभागी होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कतारमध्ये FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घाटन सोहळ्याला बरेच सेलिब्रिटीज हजेरी लावणार आहे. एकंदरच हा उद्घाटन सोहळा चांगलाच भव्य पद्धतीने पार पडणार असल्याचं म्हंटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच ती या वर्षीच्या अधिकृत FIFA गाण्यात दिसली होती. “लाइट द वर्ल्ड” हे गाणं आणि तो व्हिडिओ चांगलाच गाजला होता. या समारंभात नोराला थीरकताना बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहे. नोरा तिच्या हटके अंदाजात या सोहळ्यात पेरफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा : “बॉलिवूड स्वतःच्याच विश्वात…” गीतकार प्रसून जोशी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर केली खरमरीत टीका

याबरोबरच बीटीएस ग्रुपमधील जंगकूकदेखील या सोहळ्यात परफॉर्म करणार असल्याची पुष्टी झाली आहे, शिवाय लोकप्रिय गायिका शकिरा हीदेखील या सोहळ्यात दिसणार असल्याची चर्चा आहे पण त्यावर अजून कोणतंच स्पष्टीकरण आलेलं नाही. एकूणच या सगळ्या स्टार्सच्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एच डी वर प्रसारित केला जाईल. जिओ सिनेमा अॅप आणि त्याच्या वेबसाइटवर सामन्यांचे थेट प्रसारणदेखील असेल. इतकंच नाही तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेदेखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.