सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांत दोघं लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा हा लग्न सोहळा आहे. गेल्या काही दिवसांपासून परिणीती व राघव चड्ढा यांच्या लग्नाबाबत दररोज काहींना काही अपडेट येत असतात. पण अशातच आज परिणीतीचं एक रुप पाहायला मिळाल आहे; ज्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मराठी मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप; आज प्रसारित होणार शेवटचा भाग

अभिनेत्री परिणीता चोप्रा पापाराझींवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत, परिणीती गाडीतून उतरते तितक्यात तिला पापाराझी परीजी म्हणून हाक मारतात. पण हे पाहून ती भडकते आणि म्हणते, “मी तुम्हाला बोलावलं नव्हतं.”

हेही वाचा – “सुप्रिया ताई…” दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…

त्यानंतर पापाराझी तिचा व्हिडीओ शूट करणं न थांबवता सुरुच ठेवतात. हे पाहून पुन्हा परिणीती मागे येऊन हात जोडून म्हणते की, “सर प्लीज तुम्ही बंद करा. माझी विनंती आहे.” सध्या परिणीतीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “मराठी माणसाने पाय खेचण्याची वृत्ती सोडली पाहिजे”, कोकण हार्टेड गर्ल स्पष्टच बोलली; म्हणाली…

हेही वाचा – ‘ताली’ सीरिजला एक महिना पूर्ण, छोट्या गौरी सावंतनं सादर केली अप्रतिम कलाकृती, व्हिडीओनं वेधलं लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती व राघव यांचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे. २२ तारखेपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर २३ सप्टेंबरपासून मेहंदी, हळद आणि संगीताचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

हेही वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने नाना पाटेकरांची घेतली भेट, अनुभव सांगत म्हणाली, “इतका साधेपणा…”

दरम्यान, १३ मे २०२३ला परिणीती व राघव यांनी साखरपुडा करत सगळ्यांनाच सुखद धक्का दिला होता. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी परिणीती व राघव यांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. यावेळी कलाक्षेत्रासह राजकीय विश्वातील दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. दोघांचे साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress parineeti chopra get angry on paparazzi video goes viral on social media pps