बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा संपन्न झाला. परिणीतीने साखरपुड्याचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परिणीती गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चांगलीच चर्चेत होती. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव लग्न कधी करणार आहेत याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. खुद्द परिणीतीने लग्न कधी करणार याबाबतचा खुलासा केला आहे. परिणीतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा- Video : “एवढा अहंकार…”; करीना कपूरची चाहतीशी वर्तणूक पाहून नेटकरी भडकले
मंगळवारी पापाराझींनी परिणीती चोप्राला तिच्या मुंबईतील घराबाहेर पाहिले. परिणीतीला पाहताच पापाराझींनी तिला लग्नाच्या तारखेबाबत विचारणा केली. सुरुवातीला परिणीतीने उत्तर देणं टाळलं. मात्र, पापाराझींच्या सततच्या विचारणांमुळे परिणीती म्हणाली, ‘ईशाला विचारा. त्यांना माहीत आहे. एवढंच बोलून परिणीती तिथून निघून गेली. परिणीती व राघव चड्ढा यांच्याकडून लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, हे दोघे २०२३च्या ऑक्टोबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर ती शेवटची सूरज बडजात्याच्या ‘उंचाई’ चित्रपटामध्ये दिसली होती. लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये परिणीती दिलजीत दोसांझसोबत प्रमुख भूमिकेत दिसेल.