बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा १३ मे २०२३ रोजी संपन्न झाला. दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या दोघांचा साखरपुडा पार पडला. दरम्यान, सध्या परिणीती चोप्राचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अलीकडेच परिणीती चोप्राने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी पापाराझींनी परिणीतीला “लग्नानंतर तुझे आयुष्य कसे सुरु आहे?” असा प्रश्न विचारला. यानंतर परिणीतीने “आमचे लग्न अजून झालेले नाही…” पुढे पापाराझींनी “मग केव्हा करणार लग्न?” असा प्रश्न केला. याबाबत अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : “मेरे लिए वही मेरा…” कियारा अडवाणीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पती सिद्धार्थ मल्होत्राबद्दल खुलासा करीत म्हणाली…
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आतापर्यंत या जोडप्याने लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, दोघेही या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उदयपूरमधील उदयविलास पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत परंतु, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा : मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला दिल्लीत; सेटवरचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर लीक
परिणीती आणि राघवचा दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये १३ मे २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. बॉलीवूड कलाकारांपासून ते बडे नेतेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. परिणीती आणि राघव बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करीत आहेत.
परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यापूर्वी तिचा ‘ऊंचाई’ चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच ती इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये दिलजीत दोसांझबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.