सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आणि त्यातील नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘बेशरम रंग’ हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून चांगलाच वाद रंगला आहे. मध्य प्रदेशमधील इंदौर शहरात या गाण्याविरोधातील आंदोलन करण्यात आलं. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही चित्रपटाला विरोध केला आहे. या वादामुळे ‘बॉयकॉट पठाण’ हा ट्रेंडही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. वेगवेगळ्या स्तरातून आता या वादावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री पायल रोहतगी हिने मात्र वेगळंच विधान करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे हा वाद पूर्णपणे बिन बुडाचा आहे आणि याला काहीच अर्थ नासल्याचं पायलने स्पष्ट केलं आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पायल म्हणाली, “माझ्यामते हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आहेत. एखाद्या रंगाला उद्देशून वाद निर्माण करणं चुकीचं आहे, दीपिकाच्या बिकिनीवर कोणत्याही सनातन धर्मातील देवी देवतांचे फोटो नाहीयेत. केवळ एका विशिष्ट रंगावरून एखाद्या कलाकृतीला विरोध कसा करता येऊ शकतो?”

आणखी वाचा : कियारा अडवाणीला करायचं होतं आलिया भट्टच्या या चित्रपटात काम केलं; मुलाखतीदरम्यान व्यक्त केली खंत

इतकंच नाही तर पायलला दीपिका आणि शाहरुखची ही केमिस्ट्री चांगलीच आवडली आहे. शिवाय दीपिकाला अश्लील म्हणून हिणवणाऱ्या लोकांचाही तिने चांगलाच समाचार घेतला आहे. याविषयी भाष्य करताना तिने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना पायल म्हणाली, ““जर दीपिका या गाण्यात तुम्हाला अश्लील वाटत असेल तर मग आपल्याच देशात पॉर्नसारखी गोष्ट तुम्ही कशी सहन करता? इथे आपल्या मनोरंजनसृष्टीत तर एका पॉर्नस्टारला अभिनेत्रीचा दर्जा दिलेला आहे. तिचा उदोउदो आपण करतो असतो. हा दुटप्पीपणा थांबवला पाहिजे. उगाचच भगव्या रंगाचा आधार घेऊन या वादाला आणखी मोठं होण्यापासून रोखलं पाहिजे.”

‘पठाण’मुळे निर्माण झालेला हा वाद आणखीनच वाढतो आहे. काही ठिकाणी हा चित्रपट पूर्णपणे बॉयकॉट करण्याची तयारी सुरू आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.