९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री प्रीती झिंटा लग्नानंतर परदेशात राहायला गेली. तिथे तिचं वैवाहिक जीवन सुरळीत सुरू आहे. नेहमी ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना आपल्या जीवनाबाबत माहिती देत असते. काही तासांपूर्वी तिनं चाहत्यांबरोबर दुःखद बातमी शेअर केली आहे. प्रीतीनं आपल्या सासऱ्यांचं निधन झाल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा – “जो भी होगा देखा जायेगा” म्हणतं एव्हरग्रीन नारकर कपलनं नवा व्हिडीओ केला शेअर; नेटकरी म्हणाले…
प्रीतीनं सासऱ्यांबरोबरचा एक फोटोबरोबर शेअर करत भावुक पोस्ट लिहीली आहे. तिनं लिहील की, “प्रिय जॉन, तुमचा दयाळूपणा आणि समजूतदारपणा माझ्या कायम स्मरणात राहिल. मला तुमच्याबरोबर शूटींगला जाणं, तुमच्या आवडीचा भारतीय पदार्थ बनवणं आणि सूर्याच्या प्रकाशात प्रत्येक विषयावर चर्चा करणं खूप आवडायचं.”
“माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही तुमच्या घराचं आणि मनाचं दार उघडलं, याकरिता खूप खूप धन्यवाद. तुमच्या जाण्यामुळे आता घरातलं वातावरण कधीच पहिल्यासारखं नसेल. मला विश्वास आहे की, तुम्ही एका योग्य ठिकाणी आनंदी आहात. तुमच्या आत्मास शांती लाभो.”
हेही वाचा – ‘ताली’मधील सुव्रतच्या लूक टेस्टची सासूबाईंनी सांगितली गंमत; शुभांगी गोखले म्हणाल्या, “साडी आणि ब्लाउज…”
दरम्यान, प्रीतीनं जीन गुडइनफबरोबर लग्न केल्यानंतर ती लॉस एंजेलिसला गेली. कधी कधी ती भारतात येते. २०२१मध्ये सरोगसी प्रक्रियेद्वारे प्रीती आई झाली. तिला दोन जुळी मुलं आहेत.
हेही वाचा – नाकतोडे, रेशीमकिडे, रातकिडे खातानाचा अभिनेता सुव्रत जोशीचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “हा जेवणाचा….”
प्रीतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १९९८ साली ‘दिले से’ या चित्रपटापासून प्रीतीनं करिअरला सुरुवात केली होती. सुंदरता आणि अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिनं बऱ्याच चित्रपटात काम केलं. २००८मध्ये ‘हेवन ऑन अर्थ’मध्ये काम केल्यानंतर तिनं दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर प्रीतीनं ‘इश्क इन पॅरिस’ या कॉमेडी चित्रपटातून पुनरागमन केलं.