बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही महिन्यांपासून राखी सावंत आणि तिचा दुसरा पती आदिल खान यांच्यात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार केली होती. त्या दोघांच्या नात्यात कटुता आली असून आदिलने मारहाण केल्याचा आरोप राखीने केला होता. राखीचा पती आदिलला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता राखीने आदिलबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच विरल भय्यानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी ही भारतात परतल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात परतल्यानंतर ती मुंबईत एका ठिकाणी स्पॉट झाली. यावेळी तिला पापाराझींनी विविध प्रश्न विचारले. त्यावेळी तिने तिच्या दुबईतील अॅक्टिंग स्कूल आणि त्याचा अनुभव सांगितला.
आणखी वाचा : “चुकीच्या मार्गाने…” राखी सावंतने पती आदिल खानकडून मागितली दीड कोटींची रक्कम

यावेळी आदिलबद्दल बोलताना राखी म्हणाली, “मला आदिल जेलमधून फोन करतोय, मेसेज करतोय आणि गयावया करत आहे. मला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे. मला परत यायचं, मला एक संधी दे. पण आदिल ज्यावेळी मी तुझ्या पाया पडून सांगत होते की तू घरी परत ये, तेव्हा तू माझे काहीही ऐकलं नाही आणि आता तू मला विनवणी करतोस. पण नाही, हे शक्य नाही.”

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्राणीबरोबर राखी सावंतचे वाद सुरू आहेत. राखीने आदिलवर लैंगिक शोषण आणि मारहाणीचे आरोप लावले आहे. त्यानंतर त्याला पोलीसांनी अटक केली आहे. या दरम्यान आदिल खानवर एका इराणी तरुणीने मैसूरमध्ये बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress rakhi sawant said adil khan called me from jail said nrp