शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. तसेच चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार असं चित्र दिसत आहे. अशातच राखी सावंतने चित्रपटाला आणि शाहरुख खानला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री राखी सावंत गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केल्याचा खुलासा केला. दुसरीकडे तिची आई रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची आई ब्रेन ट्युमर या आजारामुळे त्रस्त आहे. नुकतीच तिने पठाणवर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती असं म्हणतेय, “पठाणसाठी शाहरुखजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ‘पठाण’ चित्रपटातील गाण्यावर माझे रील करायचे राहून गेले कारण माझी आई रुग्णालयात आहे. पण मी प्रयत्न करेन रील बनवण्याचा.”

“राहुल माझ्या भावासारखा…” बहिणीच्या लग्नानंतर अहान शेट्टीने दिली दाजींबाबत प्रतिक्रिया

राखीने व्हिडिओमध्ये आईला हाक मारली आहे ती असं म्हणते “आई शाहरुखच्या पठाणला तुझा आशीर्वाद दे, शाहरुखचा पठाण हिट होणार” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. हा व्हिडीओ रुग्णालयाबाहेरचा आहे जिथे तिच्या आईला ठेवण्यात आले आहे.

यशराज फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी काही ठिकाणी संपूर्ण थिएटरच बूक केल्याचं वृत्त आहे.

Story img Loader