आमिर खान आणि अक्षय कुमारसारख्या मोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉयकॉट केल्यानंतर सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंड चांगलाच जोर धरू लागला आहे. ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटालाही बॉयकॉटचा सामना करावा लागेल अशी एकूणच परिस्थिति दिसत आहे. शिवाय विजय देवरकोंडाने केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्या ‘लायगर’ चित्रपटाला बसलेला फटका आपण पाहिलाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता नुकतंच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हीने बॉयकॉट संदर्भात भाष्य केलं आहे. ‘इंडिया टाईम्स’च्या वृत्तानुसार रकुलने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य दिलं आहे. रकुल म्हणाली, “बॉयकॉटमुळे केवळ कलाकारच नाही तर चित्रपटनिर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेलाच फटका बसतो, आणि यामध्ये सारी चित्रपटसृष्टी होरपळून निघते. या इंडस्ट्रीमुळे कित्येकान रोजगार मिळतो, बॉयकॉटमुळे त्यांच्या पोटावर पाय येऊ शकतो.” आपल्या आगामी ‘डॉक्टर जी’ चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना रकुलने यावर स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : अमिताभ यांच्या पाठोपाठ अनुपम खेर यांचा ‘उंचाई’मधील लूक आला समोर; ‘ही’ महत्त्वाची भूमिका साकारणार

‘डॉक्टर जी’ या चित्रपटात रकुल आयुष्मान खुरानाबरोबर आपल्याला दिसणार आहे. हा चित्रपट एका स्त्रीरोगतज्ञ क्षेत्राशी संबंधित आहे. याबरोबरच या चित्रपटात शेफाली शहासारखी कसलेली अभिनेत्री आपल्याला बघायला मिळेल. या चित्रपटाबरोबरच रकुल अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘थॅंक गॉड’मध्ये झळकणार आहे.

या चित्रपटामध्ये चित्रगुप्त यांचं विनोदी पद्धतीने चित्रीकरण केल्याने या चित्रपटालाही बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. बाहेरील काही देशात तर या चित्रपटावर बंदी आलेली आहेच. भारतातही याला प्रचंड विरोध होताना आपल्याला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर रकुलने बॉयकॉटबद्दल कलेलं वक्तव्य या चित्रपटाला मारक ठरलं तर त्यांचं आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.