बॉलिवूडमधील राणी मुखर्जी एक गुणी अभिनेत्री आहे. नुकताच तिचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘राजा की आयेगी बारात’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटाने तिला वेगळी ओळख मिळाली. मात्र त्याआधी तिने आमिर खानसारख्या मोठ्या अभिनेत्याबरोबर काम केलं आहे. त्या चित्रपटाविषयी नुकतंच राणीने भाष्य केलं आहे.
नव्वदचं दशक संपत असताना आमिर खानच्या एका चित्रपटाने त्याची ओळख बदलवून टाकली तो चित्रपट म्हणजे ‘गुलाम’. या चित्रपटात आमिर खान व राणी मुखर्जी ही जोडी पहिल्यांदा दिसली होती. रेणू मुखर्जीच्या सुरवातीच्या काळातील हा चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला मात्र या चित्रपटाबाबत राणी मुखर्जीने खंत व्यक्त केली आहे. नुकत्याच इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली, “जेव्हा तुम्ही नवे असता तेव्हा चित्रपटांच्याबाबतीत तुमच्याकडे पर्याय नसतो. चित्रपट उत्तम व्हावा यासाठी निर्माते निर्णय घेत असतात. फक्त ‘गुलाम’ या चित्रपटासाठी माझा आवाज डब करण्यात आला होता.”
ती पुढे म्हणाली, “गुलामच्या वेळी माझ्या आवाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते कारण मी आमिरच्या हिरॉईन साकारत होते. चित्रपटासाठी चांगला आवाज हवा होता म्हणून माझा आवाज डब करण्यात आला मला याबाबत सांगण्यात आले होते. मला याचे दुःख झाले पण मी ते मनावर घेतले नाही. ही काही मोठी गोष्ट नाही. मला अजूनही वाटत ‘गुलाम’ चित्रपटात माझं असं काहीच नव्हतं.”
करण जोहरचे आभार मानत तो पुढे म्हणाली, “त्यानंतर ‘कुछ कुछ होता हैं’ च्या वेळी करण जोहरने मला विचारले होते तुला डबिंगसाठी कोणती अडचण नाही ना? मी म्हणाले नाही, त्यावर तो म्हणाला तुझ्या पहिल्या चित्रपटात तुझाच आवाज होता ना? मी होकार दिला. त्याला माझा आवाज आवडला आणि त्याची इच्छा होती मीच डबिंग करावे.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.