बॉलिवूडमध्ये मोजकेच चित्रपट करूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या अभिनेत्री रती अग्निहोत्री या आज त्यांचा ६२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती आणि केवळ वयाच्या १० व्या वर्षापासूनच त्यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. सुप्रसिद्ध तामीळ दिग्दर्शक भारती राजा यांनी रती यांना एकेदिवशी शाळेतील नाटकात काम करताना पाहिलं आणि तेव्हाच त्यांनी रती यांच्या वडिलांकडे तिला चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. अशारीतीने वयाच्या १६ व्यावर्षी रती यांनी ‘पुदिया वरपुकल’ या पहिल्या चित्रपटातून या क्षेत्रात पदार्पण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना बऱ्याच ऑफर्स आल्या आणि केवळ ३ वर्षात रती यांनी तामीळ आणि कन्नड असं मिळून तब्बल ३२ चित्रपटात काम केलं. सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी अशा मातब्बर कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं. १९८१ मध्ये कमल हासन यांच्याबरोबर ‘एक दुजे के लीये’ या चित्रपटातून रती यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लगेचच १९८५ मध्ये रती यांनी उद्योजक अनिल वीरवानी यांच्याशी लग्नगाठ बांधली.

आणखी वाचा : विश्लेषण : सुपरहिरोजपेक्षा ‘अवतार’ का ठरतो सरस? जेम्स कॅमेरुन यांचा मॅजिकल टच कसा ठरतो यशाचा हीट फॉर्म्युला?

लग्नानंतर रती यांचं आयुष्यात बरेच उतार चढाव आले आणि त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरीच चर्चादेखील झाली. रती आणि त्याचे पती यांच्यात सतत खटके उडत होते, आणि हे वाद शेवटी इतके विकोपाला गेले की दोघांनी एकमेकांना मारहाणदेखील केली होती. २०१५ मध्ये रती यांनी त्यांच्या पतीवर जीवे मारण्याची धमकी देण्याचे आरोपही लावले होते. इतकंच नाही तर त्यांनी याबाबत पतीच्या विरोधात तक्रारदेखील दाखल केली.

अखेर या सगळ्या मनस्तापातून मोकळं व्हायचं रती यांनी ठरवलं आणि लग्नाच्या तब्बल ३० वर्षांनंतर २०१५ मध्ये पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१६ मध्ये ‘डिटेक्टर’ आणि ‘काजल’ या मालिकेतून रती यांनी पुनःपदार्पण केलं होतं. रती सध्या त्यांचा मुलगा तनुज वीरवानीबरोबर राहत आहे. रती यांनी आजवर १० भाषांमध्ये मिळून १५० चित्रपटात काम केलं आहे.