‘पत्थर के फूल’, ‘अंदाज अपना अपना’, ‘कहीं प्यार ना हो जाए’, ‘दुल्हे राजा’, ‘मोहरा’, ‘केजीएफ’… या आणि अशा अनेक हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. ( Raveena Tandon ) रवीना ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री सध्या काही मोजक्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असली तरी तिच्या चर्चा कायमच होताना दिसतात. रवीना सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. अशातच आता अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि त्यामुळे रवीनाचे चाहत्यांकडून कौतुकही होत आहे. पण, अभिनेत्रीनं असं नेमकं काय केलं? चला बघूया…

अभिनेत्री रवीना टंडनच्या ( Raveena Tandon ) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवीना तिची मुलगी राशाबरोबर विमानतळावर दिसत आहे. आई व मुलगी दोघेही विमानतळावर पोहोचताच, पापाराझी त्यांना फोटो घेण्यासाठी थांबवतात. त्यानंतर पापाराझी दोघी मायलेकींचे फोटो घेतात. यावेळी पापाराझी त्यांची विचारपूसही करतात. मग एक फोटोग्राफर त्यांच्या कानातल्या दागिन्यांचे कौतुक करतो. यावर रवीना त्याला हवे आहेत का, असं विचारते आणि नंतर ती तिचे कानातले त्या फोटोग्राफरला देते. तिचे हे कौतुक पाहून सगळेच फोटोग्राफर चकित होतात. आणि तिला धन्यवादही म्हणतात.

फोटो काढणाऱ्या पापाराझीला दिली मौल्यवान वस्तू

विमानतळावरील व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री ( Raveena Tandon ) तिच्या सोन्याचे कानातले एका पापाराझीला भेट देताना दिसत आहे. जेव्हा अभिनेत्री असे करते, तेव्हा मागे उभी असलेली तिची मुलगी राशा तिच्याकडे फक्त पाहत राहते. रवीनाच्या या कृतीबद्दल चाहत्यांनी तिच्या नम्रतेचे कौतुक केले आहे आणि तिला इंडस्ट्रीतील सर्वांत गोड अभिनेत्री, असेही म्हटले आहे. रवीना तिच्या उदारतेमुळे चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात तिने एका सामूहिक विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. याबद्दलही तिचे कौतुक झाले होते.

दरम्यान, रवीनाच्या ( Raveena Tandon ) कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची संजय दत्त, पार्थ समथान, खुशाली कुमार व अरुणा इराणी यांच्याबरोबर ‘घुडाचढी’मध्ये दिसली होती. त्यानंतर ती लवकरच अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह जॅकलिन फर्नांडिस, संजय दत्त, दिशा पटानी, परेश रावल, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, फरीदा जलाल व जॉनी लिव्हर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader