बॉलीवूड अभिनेत्री रेखा सौंदर्याच्या बाबतीत आजही आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. रेखा त्यांच्या करिअरबरोबरच खासगी आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिल्या होत्या. त्या काळी रेखा यांचं नाव सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा तर बऱ्याच झाल्या होत्या. रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे जया बच्चन आणि रेखामध्ये वाद झाला असल्याचे सांगण्यात येते. पण केवळ जया बच्चनच नाही तर बॉलीवूडमध्ये आणखी अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांचा रेखा यांच्याबरोबर छत्तीसचा आकडा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘सत्य प्रेम की कथा’च्या एका गाण्यावर निर्मात्यांनी खर्च केला पाण्यासारखा पैसा; रक्कम वाचून बसेल धक्का

मिळालेल्या माहितीनुसार रेखा आणि नर्गिस यांच्यातही वाद झाला आहे. १८८४ मध्ये रिलीज झालेल्या ‘जमीन आसमान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि संजय दत्त एकमेकांच्या जवळ आले होते. रेखा आणि संजय दत्त यांच्याबद्दल इंडस्ट्रीत वेगवेगळ्या अफवा ऐकायला मिळत होत्या. रेखा यांनी संजय दत्त यांच्या नावाच कुंकू लावलं असल्याची अफवाही ऐकायला मिळाली होती. पण त्यापूर्वी १९७६ साली नर्गिस यांनी रेखा यांच्याबाबत मीडियासमोर मोठं वक्तव्य केलं होतं. नर्गिस म्हणाल्या होत्या, “ती जाणूनबुजून पुरुषांना असे संकेत देते जेणेकरून त्यांना वाटेल की ते तिला सहज साध्य करतील. मात्र, काही लोकांच्या नजरेत ती चेटकिणीपेक्षाही भयंकर होती.

हेही वाचा- बंगल्याबाहेर अनवाणी पायांनी चाहत्यांची भेट का घेतात अमिताभ बच्चन? पहिल्यांदाच खुलासा करत म्हणाले…

\जया बच्चन आणि नर्गिस यांच्याव्यतिरिक्त रेखा यांचे अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्याशीही वाकडं होतं. ‘भोला-भाला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा आणि मौसमी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. जेव्हा या चित्रपटाचे पोस्टर समोर आले, तेव्हा पोस्टमध्ये रेखा यांच्या फोटोला मौसमींपेक्षा जास्त जागा देण्यात आली होती. यावरूनही दोघींमध्ये मोठा वाद झाला असल्याचे सांगण्यात येतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress rekha and her fight with other actresses apart from jaya bachchan dpj