बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांंनी नुकताच आपला ७५ वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रेखा, जया बच्चन, धर्मेंद्र, विद्या बालन, जितेंद्र, जॅकी श्रॉफ यांच्यासाऱखे बॉलीवूडमधील अनेक कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, या पार्टीतला रेखा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रेखा हेमा मालिनींच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रेखा यांच्याबरोबर हेमा मालिनीही या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ७० च्या दशकात हेमा मालिनी आणि रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हेमा मालिनी आणि रेखा यांच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्य़ा प्रमाणात कमेंट करत आहेत.
हेमा मालिनींच्या मुली ईशा व अहाना यांनी वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत हेमा मालिनींचे पती धर्मेंद्रही हजर होते. मात्र, हेमा मालिनी यांची सावत्र मुलं सनी आणि बॉबी देओल मात्र या पार्टीत सहभागी झाले नव्हते. १८ जूनला सनी देओलचा मुलगा करणचे लग्न द्रिशा आचार्यबरोबर झाले. या लग्नात संपूर्ण देओल कुटुंबीय सहभागी झाले होते. मात्र, हेमा मालिनींसह त्यांच्या दोन्ही मुली या लग्नसमारंभात गैरहजर होत्या.
हेही वाचा- ‘अॅनिमल’मध्ये बॉबी देओल दिसणार नरभक्षकाच्या भूमिकेत? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण
हेमा मालिनी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ७० च्या दशकात हेमा मालिनींनी आपल्या अभिनय आणि सौंदर्यांने अनेकांना भूरळ पाडली होती. गेली चार ते पाच वर्षे हेमा मालिनी अभिनय क्षेत्रापासून लांब आहेत. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिमला मिर्च’ या चित्रपटात हेमा मालिनी शेवटच्या दिसल्या होत्या. परंतु, आता त्या पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलने हेमा मालिनी यांच्या पुनरागमनाबाबत भाष्य केलं होतं.