बॉलीवूड अभिनेत्री रेखा नेहमीच चर्चेत असतात. आपल्या कारकिर्दित रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांव्यतरिक्त आपल्या खासगी आयुष्यामुळेही रेखा अनेकदा चर्चेत राहिल्या होत्या. त्या काळी अभिनेत्री रेखा यांचं नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडल गेलं होतं. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा तर बऱ्याच रंगल्या होत्या. दरम्यान सोशल मीडियावर रेखा यांचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नबाबत विधान केलं होतं. या विधानाने त्याकाळी मोठी खळबळ माजली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- जेव्हा गिरीश कर्नाड नीना गुप्ता यांना म्हणाले, “तू कधीच हिरॉईन होणार नाहीस कारण…” नेमका किस्सा जाणून घ्या

काही वर्षांपूर्वी रेखा यांनी सिमी ग्रेवाल यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. जेव्हा सिमी यांनी रेखा यांना तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्या उत्तराने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. रेखा यांच्या उत्तराने निरनिराळ्या चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचा- व्हायरल ‘डीपफेक’ व्हिडीओनंतर रश्मिका मंदाना आली मीडियासमोर; ‘अशी’ होती अभिनेत्रीची अवस्था

सिमी यांनी रेखांना “तुम्हाला दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा आहे का?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नला उत्तर देत रेखा म्हणालेल्या “कुणाबरोबर पुरुषाबरोबर का?” रेखांचा हा प्रश्न ऐकून सिमी म्हणाल्या “नक्कीच तुम्ही कोणत्या महिलेशी तरी लग्न करणार नाही.” यावर रेखा म्हणाल्या, “का नाही करणार? मी मनातल्या मनात स्वत:शी माझ्या करिअरबरोबर आणि माझ्या चाहत्यांशी लग्न केलं आहे.”

रेखा यांनी १९०० मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही दिवसातच मुकेश यांनी आत्महत्या केली. मुकेश यांच्या आत्महत्येला अनेकांनी रेखा यांना जबाबदार धरले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress rekha desire to marry a woman throwback video viral dpj