कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवरील शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ खूपच लोकप्रिय आहे. कपिलचा शो नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत असतो. सुनील ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांच्याप्रमाणेच अर्चना पूरन सिंह या शोचा एक महत्त्वाचा भाग आहे. या शोमध्ये पाहुणे येतात तेव्हा त्यांच्याबरोबर अर्चना जुने किस्से व आठवणी शेअर करत असते. या शोच्या एका एपिसोडमध्ये गोविंदा, चंकी पांडे व शक्ती कपूर आले होते. त्या एपिसोडदरम्यान अर्चनाने एक व्लॉग केला आहे. त्या व्लॉगमध्ये तिने फ्लॅट खरेदी करताना शक्ती कपूर यांनी पैशांची मदत देऊ केली होती, असं सांगितलं.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा अर्चनाला मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता, तेव्हा शक्ती कपूर यांनी पैशांची मदत देऊ केली होती, असं अर्चना म्हणाली. त्यावर तिने आधीच तीन बंगले विकत घेतले आहेत आणि आता चौथा बंगला घेण्याची तयारी करत आहे, असं म्हणत शक्ती कपूर व्लॉगमध्ये अर्चनाला चिडवतात. त्यावर “नजर लावू नकोस,” असं अर्चना मजेशीरपणे म्हणते. त्यावर शक्ती कपूर म्हणतात, “माझी नजर तुला लागूच शकत नाही.” यानंतर अर्चनाला ते दिवस आठवले जेव्हा ती फ्लॅट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिला शक्ती कपूर यांनी ५० हजार रुपये उसने देऊ शकतो, असं म्हटलं होतं. “मी कधीच विसरू शकत नाही. जेव्हा मला फ्लॅट घ्यायचा होता, तेव्हा त्याने मला ५० हजार रुपयांची मदत करू शकतो असं सांगितलं. जर तुला गरज असेल तर मी तुला इतके पैसे देऊ शकतो. त्या काळी ५० हजार रुपये ही खूप मोठी गोष्ट होती,” असं अर्चना म्हणाली.
हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
चंकी पांडेने सांगितला एक किस्सा
नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये चंकी पांडेने शक्ती कपूर यांचा एक किस्सा शेअर केला होता. एकदा शक्ती कपूर यांनी एका नवोदित अभिनेत्याला ५० हजार रुपये पाठवले होते. त्याला खलनायक म्हणून कास्ट केलं जाणार होतं. ९० च्या दशकात शक्ती इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय खलनायक होता. त्यामुळे त्याने त्या अभिनेत्याला ५० हजार रुपये दिले आणि त्याला हिरो म्हणून मुख्य भूमिकेत घेणार असं वचन दिलं. “हा अभिनेता चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून पदार्पण करणार होता. शक्ती काळजीत पडला. त्याने
त्या अभिनेत्याला ५० हजार रुपये पाठवले आणि खलनायकाची भूमिका करू नकोस असं सांगितलं. तसेच त्याला हिरो म्हणून सिनेमात घेणार असंही सांगितलं. त्या अभिनेत्याने ५० हजार रुपये घेतले आणि तो दोन वर्षे घरी बसला होता,” असं चंकी पांडे म्हणाला. त्यावर “हे सगळं खोटं आहे. हा खोटं बोलत आहे,” असं शक्ती कपूर म्हणाले.
शक्ती कपूर आता फार चित्रपट करत नाहीत. ते शेवटचे संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’मध्ये दिसले होते.