बॉलीवूड अभिनेत्री सना खानने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला. अनस सय्यदबरोबर लग्न केल्यानंतर दोन वर्षांनी सना आई बनली. सनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. बाळाच्या जन्मानंतर अनेकांना त्याच्या नावाबाबात उत्सुकता लागली होती. आता सना खानने आपल्या बाळाचे नाव जाहीर केले आहे.
हेही वाचा- “आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं वक्तव्य चर्चेत
‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सना खानने तिच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. सना आणि अनस यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘सय्यद तारिक जमील’… असे ठेवले आहे. दोघांच्या मते- या नावाचा माणसावर खूप प्रभाव पडतो. सना म्हणाली, “आम्हाला आमच्या मुलासाठी पवित्रता, प्रेम, काळजी व प्रामाणिकपणा दर्शवणारं नाव हवं होतं. जमील म्हणजे सौंदर्य आणि तारिक म्हणजे आनंददायी.”
हेही वाचा- “तू गे आहेस ना?”, विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरने दिले थेट उत्तर; म्हणाला, “तुला माझ्यात…”
बाळाच्या जन्माबाबत बोलताना सना म्हणाली, “मला अजूनही विश्वास बसत नाही की, तो माझा मुलगा आहे. मी दुसऱ्याच्या मुलाला भेटायला आलेय, असंच मला वाटतंय. गरोदरपणाच्या काळात स्त्री अनेक बदलांमधून जात असते. जेव्हा तुमचं बाळ रडतं तेव्हा तुम्हालाही रडू येतं. ते इतकं लहान आहे की, त्याला कसं धरायचं तेही मला कळत नाही. सध्या माझी सासू त्याचे डायपर बदलते.”
दरम्यान, बाळाच्या जन्मानंतर अनसमध्ये झालेल्या बदलांबाबतही सनाने एक किस्सा शेअर केला आहे. सना म्हणाली, “बाळाच्या जन्मानंतर अनसमध्ये खूप बदल झाला आहे. बाळाच्या जन्मामुळे त्याला खूप आनंद झालाय आणि आनंदाच्या भरात त्याला अनेकदा रडताना मी पाहिलं आहे.”
हेही वाचा- “तू गे आहेस ना?”, विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरने दिले थेट उत्तर; म्हणाला, “तुला माझ्यात…”
दरम्यान, सना खान लग्नाआधी बॉलीवूड आणि हिंदी कलाविश्वात प्रचंड सक्रिय होती. मात्र, २०२० मध्ये लग्न झाल्यावर तिने फिल्म इंडस्ट्री सोडली. यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सनाने ग्लॅमरस दुनियेपासून दूर होत, स्वतःला धर्मासाठी समर्पित केल्याचे म्हटले होते. फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर काही महिन्यांनी सनाने गुपचूप उद्योगपती मौलाना अनस सय्यदशी लग्न केले.