बॉलिवूडची स्टार कीड सारा अली खान सोशल मीडियावर सक्रीय असते. कधी शुभमन गिलमुळे तर कधी चित्रपटांमुळे ती चर्चेत येत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतबरोबर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा ‘केदारनाथ’ चित्रपट सुपरहिट ठरला मात्र त्यानंतर आलेले ‘लव्हआजकल २’, ‘कुली नंबर १’ हे चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
सारा अली खानला ‘लव्हआजकल २’ अपयशी ठरल्याने खूपच दुःख झाले होते. त्याच दरम्यान तिचा ‘अतरंगी रे’ चित्रपट येणार होता. मात्र आपल्या खराब कामगिरीमुळे तिला वाईट वाटले शेवटी तिने दिग्दर्शका आनंद एल राय यांना फोन करून सांगितले की मला या चित्रपटातून काढा. तिने याबाबत खुलासा केला आहे. इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती असं म्हणाली, “माझे सलग चित्रपट फ्लॉप ठरत होते मला सुचत नव्हते काय करावे. मी माझ्या जगात हरवले होते जे करायला नको हवे होते.”
…अन् शाहरुखच्या ‘या’ चित्रपटात राणी मुखर्जीने ऐश्वर्याला केलं रिप्लेस; सेटवर नेमकं काय घडलं होतं
ती पुढे म्हणाली, “मला कळत नव्हते यातून बाहेर कसे पडावे. मला तेव्हा समजले मी एक प्रशिक्षित अभिनेत्री नाही. मी माझ्या चुका मान्य केल्या. मी अतरंगी रे चे दिग्दर्शक आनंद एल राय यांना फोन केला आणि सांगितले की मला या चित्रपटातून काढा मला नाही वाटत मी इतकी मोठी भूमिका करू शकेन. कारण माझा ‘लव्हआजकल’ चित्रपट फ्लॉप ठरला आहे.” यावर दिग्दर्शकांनी तिला असं सांगितलं “बेटा आपण जेव्हा निराश होतो तेव्हा पुन्हा आपल्यालाच उठून उभे राहायचे असते. हा असा एक चित्रपट आहे ज्यातून तू स्वःताला सिद्ध करू शकतेस. मला असं वाटत तू हा चित्रपट करावा.” हा किस्सा तिने सांगितला आहे.
सारा लवकरच ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे.