बॉलिवूड अभिनेत्री कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ सध्या चर्चेत आहे . सध्या ती तिच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात कतरिनाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कतरिना कैफने शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगितले.

सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात तिने या तिन्ही खान मंडळींबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे, ती असं म्हणाली आहे की ‘आमिर, शाहरुख, सलमान हे तिघे आयकॉन आहेत. ते गोष्टीचा भाग बनतात ती गोष्ट आपोआप उंचावते. ते जेव्हा काही सूचना देतात तेव्हा तुमच्या पात्रासाठी मदतीच्या असतात. त्यांचं चित्रपटाच्या सेटवर असणंदेखील खूप छान असते’. कतरिनाने शाहरुखबरोबर ‘जब तक है जान’ आणि ‘झिरोसारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय आमिरबरोबर ‘धूम ३’ आणि ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि सलमानबरोबर ‘पार्टनर’, ‘एक था टायगर’, ‘युवराज’, ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘भारत’, ‘टायगर जिंदा’मध्ये काम केले आहे. ‘है सारख्या उत्तम चित्रपटात काम केले.

बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीत तापसी आणि पत्रकार आमनेसामने; म्हणाली, “तुम्ही जर असे…”

कतरिनाने आपल्या कारकिर्दीची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘राजनीती’ यांसारख्या वेगवगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तिने अभिनेता अक्षय कुमारबरोबर अनेक चित्रपटात काम केले आहे. नुकतेच तिने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

नुकतंच कतरिनाने ‘टायगर ३’ साठी चित्रीकरण पूर्ण केलं असून, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीबरोबरही एका चित्रपटासाठी काम केलं आहे. हा अनुभव फारच अविस्मरणीय असल्याचं कतरिनाने स्पष्ट केलं आहे. शिवाय कतरिना शाहरुखच्या एका चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कतरिनाचा ‘फोन भूत’ हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader