सध्या देशात सगळीकडे उत्सवाचे वातावरण आहे. सामान्य जनतेप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील दिवाळी हा सण साजरा करताना दिसत आहेत. नुकतीच मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ‘बंटी बबली २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या दिवाळी सणाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.

शर्वरी असं म्हणाली ‘मला दिवाळी हा सण खूप आवडतो. आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरातील सगळे लवकर उठतो. उटणे लावून अंघोळ करतो. नवीन कपडे घालतो. मराठी गाणी ऐकत आम्ही सगळे एकत्र नाश्ता करतो. नाश्त्यामध्ये आम्ही दिवाळीचा फराळ असतो. चिवडा, चकली, शंकरपाळे, हे फराळातील पदार्थ आमच्या घरीच बनतात. एकत्र कुटुंबाबरोबर हा फराळ करताना एक वेगळीच मज्जा असते. एक नवी सुरवात होते असं मला वाटते. दिवाळी फराळात मला चकली आणि शंकरपाळे जास्त आवडतात. दिवाळीत आम्ही सगळे एकत्र असतो. एरव्ही सगळे कामात व्यस्त असतात मात्र या काळात आम्ही एकत्र येतो’.

loksatta readers feedback
लोकमानस : हकालपट्टी ही दबावतंत्राची नीती?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Pankaja Munde Speech And Suresh Dhas Speech News
Politics : सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले ‘बाहुबली’; पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी शिवगामी, मेरा वचनही है शासन”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

Photos : ‘दिवाळीत फटाके फोडू नका’ असे आवाहन करायला गेले आणि ‘हे’ सेलिब्रिटी झाले ट्रोल

शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी ती विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होती. अॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे.

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी शर्वरी वाघने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यासोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने असिस्टंट म्हणून काम केले आहे. त्यानंतर तिने ‘बंटी और बबली २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. पण तरीही शर्वरी वाघही कायमच लोकप्रिय आहे.

Story img Loader