Shraddha Kapoor New Car: २०१० मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रद्धा कपूर आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी यांची ही लाडकी लेक आता बॉलीवूडची आघाडी अभिनेत्री आहे. सतत सुपरहिट चित्रपट देताना दिसत आहे. गेल्यावर्षी श्रद्धाचा ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अशा या बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीला गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे आता श्रद्धाने आणखी एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने ४ सीटरची अल्ट्रा लग्जरी कार Lexus LM 350h खरेदी केली आहे; जी काळ्या रंगाची आहे. नुकतीच श्रद्धा या नव्या आलिशान गाडीमधून प्रवास करताना दिसली. या आलिशान गाडीची किंमत २.९३ कोटी आहे. श्रद्धाच्या या नव्या गाडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर श्रद्धा कपूरच्या आलिशान गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रद्धा जिममधून घरी जाताना पाहायला मिळत आहे. पांढरा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची टाइट्स या लूकमध्ये श्रद्धा दिसत आहे. जिममधून बाहेर पडताच श्रद्धा नव्या गाडीत बसताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे श्रद्धाच्या या नव्या गाडीमध्ये रेक्लाइनर सीट्ससह एक फ्रिजदेखील आहे.

श्रद्धा कपूर सहा आलिशान गाड्यांची आहे मालकीन

श्रद्धा कपूरच्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं तर, तिच्याकडे बऱ्याच आलिशान गाड्या आहेत. ज्याची किंमत कोट्यवधी आहे. तिच्याकडे लाल रंगाची Lamborghini Huracan Tecnica आहे. २०२३मध्ये घेतलेल्या या लग्जरी स्पोर्ट्स कारची किंमत ४ कोटी आहे. त्यानंतर श्रद्धाने २०२४मध्ये मारुती स्विफ्ट खरेदी केली होती. शिवाय तिच्याकडे ऑडी Q7, मर्सिडीज बेंज GLA, बीएमडब्ल्यू ७ सीरिज आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूरने जानेवारी २०२५मध्ये वडील शक्ती कपूर यांच्याबरोबर मुंबईत ६.२४ कोटींचं घर खरेदी केलं होतं. याशिवाय श्रद्धाचं समुद्र किनाऱ्यालगतही घर आहे; जे शक्ती कपूर यांनी १९८७ साली ७ लाखात घेतलं होतं. आता या घरातची किंमत ६० कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.